दुभाजक नसल्याने अपघातांची मालिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 08:48 PM2021-03-01T20:48:43+5:302021-03-02T02:19:33+5:30
वणी : येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामात दुभाजक न बसवल्यामुळे छोट्या-मोठ्या अपघातांची मालिका सुरू असून त्यामुळे रस्ता ओलांडणे जिकिरीचे झाले असून बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
वणी : येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामात दुभाजक न बसवल्यामुळे छोट्या-मोठ्या अपघातांची मालिका सुरू असून त्यामुळे रस्ता ओलांडणे जिकिरीचे झाले असून बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
वणी बसस्थानकापासून वणी महाविद्यालयापर्यंत दुभाजक आहे. तेथून पुढे कळवण व सापुतारा रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गावर दुभाजक नसल्यामुळे अनेक अपघात घडले जात आहेत, ज्या मार्गात दुभाजक नाही तेथे खंडेराव महाराज मंदिर, आदर्श प्राथमिक शाळा व महाविद्यालय आहे. तसेच बाजूला छोटी-मोठी नगरे वसली आहेत, त्यामुळे रस्ता ओलांडण्याच्या हेतूने जाणाऱ्या येणाऱ्यांना दुभाजक नसल्यामुळे पूर्ण रस्ता ओलांडणे जिकिरीचे बनले आहे.
चारचाकी वाहनावर जाऊन दुचाकीस्वारांचे अपघातही मोठ्या प्रमाणात होत आहेत. दुभाजक नसल्याने अपघातांची मालिका सुरू झाली आहे. रविवारच्या दुपारी गडावरून नाशिककडे प्रयाण करणाऱ्या चारचाकी वाहनांवर दुचाकीस्वार जाऊन धडकल्याने दुचाकीस्वाराच्या एका पायाचा पंजा तुटून पडला. अशा प्रकारे दुभाजक नसल्याने कुणीही कुठून रस्ता ओलांडत आहे. परिणामी अपघात होत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभागाने शहरातून जाणारा रस्ता दुभाजकासह तयार करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.