अर्णव-पार्थो दासगुप्ता ‘चॅट’प्रकरणी गंभीर दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:18 AM2021-01-19T04:18:05+5:302021-01-19T04:18:05+5:30
सोमवारी देशमुख हे नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांसोबत दुपारी त्यांनी संवाद साधला. अर्णव ...
सोमवारी देशमुख हे नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांसोबत दुपारी त्यांनी संवाद साधला. अर्णव गोस्वामी आणि पार्थोदास गुप्ता यांना लष्करी कारवाईबाबतची माहिती तसेच पुलवामा हल्ल्याबाबतची माहिती कशी मिळते? असा प्रश्न देशमुख यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला. याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. अर्णव व पार्थोदासच्या संभाषणामधून अत्यंत संवेदनशील बाबी समोर आली आहे. याबाबत राज्य सरकारकडून संपूर्ण माहिती घेतली जात असल्याचे देशमुख यांनी यावेळी सांगितले. अर्णव यांना संवेदनशील व गोपनीय माहिती मिळालीच कशी? याचा शोध घेतला जात आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित माहिती या दोघांच्या संभाषणामधून पुढे आल्याने केंद्र व राज्य सरकारदेखील सतर्क झाले असून त्याबाबत कसून चौकशी व तपास केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबईत बैठक बोलाविण्यात आली आहे, असे देशमुख यांनी सांगितले.
---इन्फो--
‘सर्जिकल स्ट्राइक’बाबतही होती माहिती
जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अत्यंत गोपनीय पध्दतीने केंद्र सरकार व भारताच्या संरक्षण मंत्रालयाकडून लष्करी कारवाईची (बालाकोट सर्जिकल स्ट्राइक) माहिती थेट रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामी यांच्यापर्यंत कशी पोहोचली आणि त्यांनी याबाबत ‘बार्क’चे माजी सीईओ पार्थाे दासगुप्ता यांच्याशी याबाबत संवाद साधत माहितीची देवाणघेवाण केल्याचेही पुढे आले आहे. एकूणच ‘टीआरपी’ घोटाळ्याचा तपास आता वेगळ्या वळणावर येऊन पोहोचला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी सुरू आहे.
---इन्फो--
गृहमंत्र्यांच्या बैठकीकडे लक्ष
राज्य सरकारच्या गृह मंत्रालयाने मंगळवारी बोलविलेल्या बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण अर्णव आणि पार्थो यांच्यामध्ये झालेल्या व्हॉट्सॲप संभाषणाच्या पाचशे पानांच्या दस्तऐवजातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने याबाबत उच्च न्यायालयात सुमारे साडेतीन हजार पानांचे पुरवणी आरोपपत्रही दाखल केले आहे.
---
फोटो आर वर १८अनिल देशमुख नावाने सेव्ह केला आहे.