सराईत गुन्हेगार "व्यंक्या"ला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 01:59 PM2017-07-19T13:59:02+5:302017-07-19T13:59:02+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार असलेल्या सराईत गुन्हेगार व्यंकटेश उर्फ व्यंक्या मोरे याला पंचवटी पोलिसांनी महाबळेश्वर येथे अटक केली आहे.

Serious criminals arrested on "Vyankya" | सराईत गुन्हेगार "व्यंक्या"ला अटक

सराईत गुन्हेगार "व्यंक्या"ला अटक

Next

नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार असलेल्या सराईत गुन्हेगार व्यंकटेश उर्फ व्यंक्या मोरे याला पंचवटी पोलिसांनी महाबळेश्वर येथे अटक केली आहे. हनुमानवाडीतील भेळ विक्रते सुनिल व हेमंत वाघ या दोघा भावंडावर हल्ला करून सुनिल वाघ याची हत्या प्रकरणी मोरे फरार होता. मोरे याच्यावर शहरातील अन्य पोलिस ठाण्यात विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत व तो अनेक गुह्यात फरार होता असे पोलिसांनी सांगितले. मोरे याच्यासह अन्य ४ ते ५ संशयितांना ताब्यात घेतले आहे अशी माहिती पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी दिली आहे. पंचवटी पोलीस ठाण्याचे गुन्हा शोध पथकाने ही कामगिरी केली आहे.

Web Title: Serious criminals arrested on "Vyankya"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.