सेवकांनी कामाप्रती निष्ठा ठेवून बदलांना सामोरे जायला हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 04:10 PM2020-12-18T16:10:29+5:302020-12-18T16:11:53+5:30
सिन्नर: मविप्र संस्थेतील सर्व सेवकांनी कामाप्रती निष्ठा ठेवून प्रामाणिक बदलांना सामोरे गेले पाहिजे. नकारात्मकता बाजूला सारुन विधायक विचार अंगीकारल्यास समाजहीत साध्य होईल, असे प्रतिपादन मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केले.
सिन्नर महाविद्यालयात मविप्रचे मानव संसाधन विकास केंद्र व सिन्नर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीय श्रेणी कर्मचारी यांचे ह्यकार्यात्मक कौशल्य व वर्तन विकासह्ण एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. व्यासपीठावर मविप्र संचालक हेमंत वाजे, प्राचार्य डॉ. ए. पी. पाटील, प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ आदी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. पी.व्ही. रसाळ यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेचा हेतू स्पष्ट केला. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे यांनी संस्था विकासात सेवकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रात मविप्रच्या मानवी संसाधन विकास केंद्राचे संचालक डॉ. ए. पी. पाटील तर कार्यशाळेच्या चौथ्या सत्रात प्राचार्य डॉ. रसाळ यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत ६५ जणांनी सहभाग नोंदविला. सूत्रसंचालन डॉ. पी. जे. तांबडे यांनी तर आभार प्रा. एस. पी. जाधव यांनी मानले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. डी. एम. जाधव, प्रा. आर. टी. गुरुळे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.