सर्व्हर डाऊनमुळे दस्त नोंदणीत अडसर; आजही सुरू राहणार नियमित कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:23 AM2020-12-05T04:23:35+5:302020-12-05T04:23:35+5:30

नाशिक : दस्त नोंदणीच्या सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे शुक्रवारी (दि.४) दस्त नोंदणीत आलेल्या अडचणी लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्यातील सर्व दस्त ...

Server downtime hinders diarrhea registration; Regular work will continue today | सर्व्हर डाऊनमुळे दस्त नोंदणीत अडसर; आजही सुरू राहणार नियमित कामकाज

सर्व्हर डाऊनमुळे दस्त नोंदणीत अडसर; आजही सुरू राहणार नियमित कामकाज

Next

नाशिक : दस्त नोंदणीच्या सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे शुक्रवारी (दि.४) दस्त नोंदणीत आलेल्या अडचणी लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्यातील सर्व दस्त नोंदणी कार्यालयांमध्ये शनिवारीही (दि.५) नियमित कामकाज सुरू राहणार असल्याची माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी दिली आहे.

सर्व्हरमधील तांत्रिक अडचणींमुळे शुक्रवारी दस्त नोंदणी करताना अडसर निर्माण झाल्याने सर्व दुय्यम निबंधक कार्यालये शनिवारीही नियमितपणे सुरू ठेवण्याचे आदेश सूचना महाराष्ट्र राज्य नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियत्रंक पुणे यांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी जिल्ह्यातील सर्व कार्यालयांमध्ये नियमित कामकाज सुरू ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. सर्व अधिकारी व कर्मचारी यांनाही पक्षकारांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने नियमित वेळेत कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

Web Title: Server downtime hinders diarrhea registration; Regular work will continue today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.