मेशी येथील कुटूंबाकडून दाणा-पाणी द्वारे पक्षांची सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 09:10 PM2021-03-30T21:10:06+5:302021-03-30T21:10:50+5:30
मेशी : कधीकाळी चिमण्यांच्या चिवचिवटाणे प्रसन्न होऊन जाणारी सकाळ चिमण्यांची किलबिल आणि विविध रंगाची माती मानवी मनाला प्रेरणा आणि शक्ती देणारी, पण ही चिमुरड्यांची चिऊताई हल्ली खऱ्या जगातून केवळ कागदावरच दिसू लागली आहे. ही खरोखरच चिंतेची बाब आहे हा धोका ओळखून त्यांची संख्या आणि तिचे अस्तित्व टिकविण्यासाठी अनेक पक्षीप्रेमी पुढे येऊ लागले आहेत.

देवळा तालुक्यातील मेशी येथील महादु मोरे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून चिऊ ताईसाठी निवारा आणि दाणा- पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था केली आहे. शिवाय त्यांच्याकडून दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या जातात. या वर्षी प्लॅस्टिकच्या टाकाऊ निकामी ड्रम पासून आकर्षक टिकाऊ घरटी बनवण्यात आली आहेत नारळाचे कवत सही आकर्षकरीत्या कापून त्यामध्ये धान्य व चिमण्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे .
सध्याच्या पिढीचे बालपण रम्य करण्यासाठी चिमण्यांच्या किलबिलाटाने मानव या विषयाचे भावविश्व समृद्ध करणाऱ्या चिऊताई चे अस्तित्व तसेच वैभव जपणे आता काळाची गरज आहे. अनेक पक्ष्यांच्या जाती अक्षरशा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. निसर्गाच्या सानिध्यात वाढलेली जुनी मानवी पिढी आणि आजचा मानव निर्मित यापुढे हतबल झाली आहे.
चिमण्या पाखरांचे निसर्गातील स्थान हे अबाधित असले तरी सध्या वाढत असणारी सिमेंटची जंगले, वाढते औद्योगीकरण, वातावरणामुळे झालेले बदल, कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणातील तसेच होत असलेली वृक्षतोड, मोबाईल टॉवरची वाढती संख्या आणि गढूळ होत असलेली मानवी मनाची मानसिकता चिमण्या पाखरांच्या अस्तित्वाला खऱ्या अर्थाने धोक्याची ठरत आहे.
सध्याचे मानवी जीवन विनाशाकडे जाऊ लागले आहे. निसर्गातील तृप्त होत असलेली पशुपक्ष्यांची संख्या खरोखरच मानवी अस्तित्वासाठी धोक्याची घंटा आहे. मात्र पक्षी प्रेमाने झपाटलेल्या महादू मोरे यांच्या या सगळ्यांना प्रेरणा देणारे उपक्रमाचे मेशीसह परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. गावातील नागरीक पाहण्यासाठी खास या ठिकाणी भेट देत आहे.