बुडणाऱ्यांना जीवदान देणारा ‘देवदूत’ थांबवणार सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:16 AM2021-02-13T04:16:10+5:302021-02-13T04:16:10+5:30

नाशिक: बुडणाऱ्यांना जीवदान देणाऱ्या देवदूताला पाण्यात उतरण्यासाठी लागणारे ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने यापुढे जीवदानाची सेवा करावी की ...

The service of stopping the 'angel' who gives life to the drowning | बुडणाऱ्यांना जीवदान देणारा ‘देवदूत’ थांबवणार सेवा

बुडणाऱ्यांना जीवदान देणारा ‘देवदूत’ थांबवणार सेवा

Next

नाशिक: बुडणाऱ्यांना जीवदान देणाऱ्या देवदूताला पाण्यात उतरण्यासाठी लागणारे ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने यापुढे जीवदानाची सेवा करावी की नाही? अशा टोकाच्या निर्णयाप्रत जीवरजक्षक गोविंद तुपे आले आहेत. तुपे यांनी आजवर बुडणाऱ्या १४० जणांना वाचविले असून जवळपास १७६८ मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहेत. निशुल्क सेवा करणाऱ्या या जीवरक्षकाला ऑक्सिजन मिळत नसल्याने त्यांच्यावर ’स्कुबा डायव्हिंग’सेट बाजुला ठेवण्याची वेळ आली आहे.

पाण्यात बुडणाऱ्यांना वाचविण्यासाठी जीवरक्षक तुपे यांना पोलीस आणि आपत्ती कक्षाकडूनदेखील आवर्जून बोलविले जाते. पट्टीचे पोहणारे तुपे हे नेहमीच अशा घटनेच्याप्रसंगी धावूनदेखील जातात. १९८४ पासून त्यांनी अनेकांना पाण्यातून वाचविले आहे तर पाण्यातील मृतदेह बाहेर काढून पोलीस प्रशासनाला मदतच केलेली आहे. पाण्यात खोलवर उतरून मृतदेहाचा शोध घेणाऱ्या तुपे यांच्या कौशल्याला तत्कालीन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णनन आणि पोलीस अधीक्षक दराडे यांच्या प्रयत्नामुळे बळ मिळाले. त्यांना स्कुबा डायव्हिंग सेट मिळाला. त्यामुळे पाण्यात खोलवर जाऊन मृतदेहांचा शोध घेणे तसेच बुडणाऱ्यांना वाचविण्यासाठीच्या कामाला गती लाभली.

परंतु स्कुबा डायव्हिंग सेटसाठी लागणारे ऑक्सिजन भरण्यासाठी त्यांना पदरमोड करावी लागते. मुंबईत जाऊन ऑक्सिजन भरून आणण्यासाठी होणारी आर्थिक ओढाताण त्यांना आता अशक्य झाली आहे. त्यामुळे आपल्या हातून यापुढे सेवा कार्य घडेल की नाही, अशा चिंतेत ते सापडले आहेत. ऑक्सिजन सिलिंडर वेळवर उपलब्ध झाले नाही तर स्कुबा सेटचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे त्यांना विना कवचकुंडले पाण्यात उतरावे लागते. अतिरिक्त सिलिंडरची किंमत ३९ हजार रुपये इतकी आहे. तर सिलिंडर भरण्यासाठी दीड ते दोन हजार रुपये लागतात. परंतु प्रत्येक वेळी त्यांना खर्च परवडत नाही. कॉम्प्रेसर मिळाला तर मोठी अडचण दूर होऊ शकेल, मात्र त्यासाठी २ लाख ८० हजार लागणार आहेत. शासकीय निधीतून यासाठी कुठूनही पाठपुरावा होत नसल्याने जीवदानाची ही सेवा तुपे यांच्यासाठी कठीण होऊन बसली आहे.

--कोट--

जीवदानाच्या कामाबद्दल राष्ट्रपती पदक मिळालेले आहे. परंतु पदकपेक्षाही ऑक्सिजन हवा आहे. पुरेपूर साहित्य मिळाले तर पाण्यात खोलवर जाऊन मदत करता येईल. प्रत्येक वेळी होणारा खर्च कठीण आहे. शेतकरी कुटुंब असल्याने इतर उदरनिर्वाहाचे साधन नाही. या कामातून कोणताही आर्थिक लाभ होत नाही. परंतु निदान परिपूर्ण व्यवस्था व्हावी, या कामाला प्रशासनाकडून शाश्वत निधी दिला तर सेवा अविरत देता येईल.

- गोविंद तुपे, जीवरक्षक.

(फोटो:आर: १२गेाविंद तुपे)

Web Title: The service of stopping the 'angel' who gives life to the drowning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.