‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ म्हणजे कन्फेशन बॉक्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:12 AM2021-07-17T04:12:25+5:302021-07-17T04:12:25+5:30
शब्दमल्हार प्रकाशन निर्मित आणि विश्वास बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर लिखित ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा कोविडच्या पार्श्वभूमीवर घरगुती ...
शब्दमल्हार प्रकाशन निर्मित आणि विश्वास बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर लिखित ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा कोविडच्या पार्श्वभूमीवर घरगुती समारंभात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून झाला. यावेळी प्रा.डॉ. वृंदा भार्गवे बोलत होत्या. याप्रसंगी प्रा. अनंत येवलेकर, कुसुमाग्रज स्मारकाचे अध्यक्ष व माजी आमदार हेमंत टकले, डॉ. कैलास कमोद यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी भार्गवे यांनी या पुस्तकातील कथा म्हणजे निरलसपणे केलेले लेखन असल्याचे सांगत प्रस्थापित जीवन व्यवहारातील ढोंगीपणावर आघातही असल्याचे सांगितले. प्रा. अनंत येवलेकर यांनी कुठल्याही साहित्याचे काम हे नात्या-नात्यांमधील सर्व्हिसिंग करणेच असते, त्याचीच प्रचिती या पुस्तकातून येत असल्याचे सांगितले. हेमंत टकले यांनी पुस्तकातील कथा ह्या माणूसपणाच्या माणसांचा सन्मान करणाऱ्या जाणीवांचा कोलाज असल्याचे सांगत काही कथांचे सूत्र स्पष्ट केले.
प्रकाशक स्वानंद बेदरकर यांनी सहज आणि स्वाभाविक लेखनशैली आणि पुस्तकातील आपलेपणाला जोडणारा धागा ही या पुस्तकाची बलस्थाने असल्याचे सांगितले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन डॉ. कैलास कमोद यांनी केले. सूत्रसंचालन दत्ता बाळसराफ यांनी केले. पसायदान राजश्री शिंपी यांनी केले. यावेळी बीएसएनएलचे वरिष्ठ महाव्यवस्थापक नितीन महाजन, ज्योती विश्वास ठाकूर, हेमंत बेळे, डॉ. हरिभाऊ कुलकर्णी, डॉ. स्मिता मालपुरे-वाकेकर, डॉ. मनोज शिंपी, विलास हावरे, विनायक रानडे, प्रसाद पाटील, नीलेश राऊत, विजय कान्हेकर आदी उपस्थित होते.
इन्फो
वाचनातून अक्षरांची ओढ : ठाकूर
विश्वास ठाकूर यांनी सांगितले, आई-वडिलांच्या संस्कारातून जीवनावर आतून प्रेम करण्याची शिदोरी मला मिळत गेली. भरपूर वाचन त्यातून अक्षरांची ओढ लागली. गेल्या पंचवीस वर्षांतील घटना, भेटलेली माणसे यांना जाणून घेऊन, समजून घेऊन व्यक्त झालो. त्याचं रूप म्हणजे ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ हे पुस्तक असल्याचेही ते म्हणाले.
फोटो- १६ विश्वास ठाकूर बुक
‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी डॉ. कैलास कमोद, ज्योती ठाकूर, लेखक विश्वास ठाकूर, डॉ. वृंदा भार्गवे, डॉ. अनंत येवलेकर, स्वानंद बेदरकर, हेमंत टकले.
160721\16nsk_10_16072021_13.jpg
फोटो- १६ विश्वास ठाकूर बुक ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी डॉ. कैलास कमोद, सौ. ज्योती ठाकूर, लेखक विश्वास ठाकूर, डॉ. वृंदा भार्गवे, डॉ. अनंत येवलेकर, स्वानंद बेदरकर, हेमंत टकले.