सत्र सुरूच : शहरातून ९० हजारांच्या दुचाकी चोरट्यांनी केल्या गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 05:15 PM2019-03-21T17:15:38+5:302019-03-21T17:20:17+5:30

दोन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून तीन दुचाकी चोरट्यांनी एकाच दिवशी लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. दुचाकीचोरीच्या वाढत्या घटनांमुळे पुन्हा चोरट्यांची टोळी सक्रीय झाल्याचे बोलले जात आहे.

Session starts at: 90,000 bicycle from the city after the robbery disappeared | सत्र सुरूच : शहरातून ९० हजारांच्या दुचाकी चोरट्यांनी केल्या गायब

सत्र सुरूच : शहरातून ९० हजारांच्या दुचाकी चोरट्यांनी केल्या गायब

Next
ठळक मुद्देशहरात दररोज एका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी दुचाकी चोरीचे गुन्हे शहरात पुन्हा वाढल्याने नाराजी

नाशिक : शहर व परिसरात चोरट्यांकडून नागरीकांची वाहने लंपास करण्याचे सत्र सुरूच असून दोन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून तीन दुचाकी चोरट्यांनी एकाच दिवशी लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. दुचाकीचोरीच्या वाढत्या घटनांमुळे पुन्हा चोरट्यांची टोळी सक्रीय झाल्याचे बोलले जात आहे.
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या सरकारवाडा पोलीस ठाण्याची हद्द अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कारण सरकारी कार्यालयांपासून न्यायालय, रूग्णालय, महाविद्यालयांसह खासगी कार्यालयांसह बाजारपेठेचा वर्दळीचा परिसर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून आर्थिक फसवणूकीच्या गुन्ह्यांसोबत दुचाकीचोरी, मोबाईल, सोनसाखळीचोरीच्या घटना वाढल्या आहेत. ठक्कर बाजार येथील नव्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारातून चोरट्यांनी श्रीहरी रमेश निकम (३८,रा.हिरावाडी) यांच्या मालकीची ३० हजारांची दुचाकी (एम.एच १५अ‍ेझेड ७७४४) हातोहात लंपास केली. दुसऱ्या घटनेत याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जिल्हा रुग्णालयाच्या वाहनतळात उभी केलेली अमोल खंडू भांडारकर (रा. शिवाजीनगर) यांच्या मालकीची ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी (एम.एच १९ बीके २१३६) चोरट्यांनी पळवून नेली.
तीसऱ्या घटनेत आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाखलगाव येथून चोरट्यांनी ३० हजार रुपये किंमतीची चंद्रभान मुरलीधर जाधव यांची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. या तीन घटनांमध्ये सुमारे एकूण ९० हजार रुपयांच्या दुचाकी चोरट्यांनी शहराच्या मध्यवर्ती भागातून चोरून नेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. दुचाकी चोरी करणाणी टोळी शाहरात पुन्हा सक्रीय झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. गुन्हे शाखेच्या वतीने दुचाकी चोरट्यांचा माग काढून मुसक्या आवळण्याची मागणी होत आहे. शहरात दररोज एका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी झाल्याची नोंद पोलीस दफ्तरी असते. दुचाकी चोरीचे गुन्हे शहरात पुन्हा वाढल्याने नाराजी व्यक्त होत आहे. या तीनही घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Session starts at: 90,000 bicycle from the city after the robbery disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.