‘सेट’ला ३ हजार ६२२ विद्यार्थ्यांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:12 AM2020-12-29T04:12:42+5:302020-12-29T04:12:42+5:30

नाशिक : पुणे विद्यापीठामार्फत महाविद्यालयीन अध्यापनासाठी अधिव्याख्याता पदासाठी रविवारी (दि.२७) नाशिकमधील १८ केंद्रांवर राज्य पात्रता परीक्षा (सेट) घेण्यात ...

The set has 3,622 students | ‘सेट’ला ३ हजार ६२२ विद्यार्थ्यांची दांडी

‘सेट’ला ३ हजार ६२२ विद्यार्थ्यांची दांडी

Next

नाशिक : पुणे विद्यापीठामार्फत महाविद्यालयीन अध्यापनासाठी अधिव्याख्याता पदासाठी रविवारी (दि.२७) नाशिकमधील १८ केंद्रांवर राज्य पात्रता परीक्षा (सेट) घेण्यात आली. नाशिकमधील ८ हजार ५६८ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केले होते. मात्र, कोरोनाचा केवळ ४ हजार ९४६ विद्यार्थ्यांनीच ही परीक्षा दिली, तर‌ तब्बल ३ हजार ६२२ विद्यार्र्थ्यांनी या परीक्षेला दांडी मारल्याने कोरोनाचा फटका राज्यातील सेट परीक्षेलाही बसल्याचे दिसून आले. यूजीसीतने महाविद्यालयीन अधिव्याख्याता पदासाठी अनिवार्य केलेली सेट परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे रविवारी महाराष्ट्र व गोवा राज्यात घेण्यात आली. नाशिकमधील केटीएचएम, केबीटी इंजिनीअरिंग, सीएसीएस, एचपीटी, आरवायके, बीवायके, भोसला, एलव्हीएच आदी विविध महाविद्यालयांतील १८ केंद्रांवर ३५७ वर्ग खोल्यांमध्ये योग्य अंतराचे नियोजन करून ही परीक्षा घेण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून विद्यार्थ्यांना मास्क व हातमोजे घालणे बंधनकारण करण्यात आले होते. यापूर्वीच्या नियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा २८ जून रोजी होणार होती. मात्र, कोरोना महामारी आणि त्यामुळे जाहीर झालेला लॉकडाऊन, यामुळे ही परीक्षा लांबणीवर पडलेली परीक्षा अखेर रविवारी घेण्यात आली असली, तरी या परीक्षेला तब्बल ३ हजार ६२२ विद्यार्थ्यांनी दांडी मारल्याने या परीक्षेलाही कोरोनाचा फटका बसल्याचे दिसून आले.

सेट परीक्षेचा पेपर एकचे स्वरूपही सोपे असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले, तर त्यासाठी एक तासाचा वेळ देण्यात आला होता. यात अध्ययन, अध्यापन, संशोधन, भाषा आकलन, संज्ञापन, तर्काधिष्ठितता, आलेख, माहितीचे विश्लेषण आदी घटकांवरील प्रश्नांचे स्वरूप सोपे व विद्यार्थ्यांच्या माहितीतील असल्यामुळे हा पेपर सोपा असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले, तर पेपर दोन हा विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर पदवीच्या विशेष विषयावरील पेपर कठीण गेल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले.

Web Title: The set has 3,622 students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.