सामनगावला आरोग्य केंद्र उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:12 AM2021-06-25T04:12:09+5:302021-06-25T04:12:09+5:30

नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात शिंदे व सिद्धपिंप्री येथे सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. मात्र, लोकसंखेच्या व भौगोलिक परिस्थितीच्या दृष्टिने ...

Set up a health center at Samangaon | सामनगावला आरोग्य केंद्र उभारा

सामनगावला आरोग्य केंद्र उभारा

Next

नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात शिंदे व सिद्धपिंप्री येथे सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. मात्र, लोकसंखेच्या व भौगोलिक परिस्थितीच्या दृष्टिने व एकलहरे गणातील सामनगाव, कोटमगाव, एकलहरेगाव, सिद्धार्थनगर, गंगावाडी, मोहगाव, बाभळेश्वर, हिंगणवेढा, माडसांगवी व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ते गैरसोयीचे ठरते म्हणून मध्यवर्ती ठिकाण म्हणुन सामनगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज आहे. शिंदे व सिद्धपिंप्री ही दोन्ही ठिकाणे १० ते १५ किलोमीटरच्या अंतरावर असल्याने सामनगाव परिसरातील रुग्णांना गैरसोयीचे होते. सामनगाव परिसरातील ग्रामीण भागात ग्रामीण रुग्णालय नसल्याने कोरोनाच्या महामारीत व इतर साथरोगावेळी रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे सामनगाव या मध्यवर्ती ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी द्यावी, अशी मागणी विजय जगताप यांनी आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे.

Web Title: Set up a health center at Samangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.