सहाय्यक प्राध्यापकपदासाठी २३ जूनला सेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 02:21 PM2019-01-24T14:21:28+5:302019-01-24T14:24:02+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सहाय्यक प्राध्यपक पदासाठी घेतली जाणारी ३५ वी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) घेतली २३ जूनला होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आले सून १ ते २१ फेब्रुवारीदरम्यान या परीक्षेला प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांना आॅनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सहाय्यक प्राध्यपक पदासाठी घेतली जाणारी ३५ वी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) घेतली २३ जूनला होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आले सून १ ते २१ फेब्रुवारीदरम्यान या परीक्षेला प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांना आॅनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
सहाय्यक प्राध्यपक पदासाठी घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय परीक्षेच यावर्षापासून स्वरुप बदलले असून आता नेट परीक्षेच्या पार्श्वभूमिवर सेट परीक्षा घेतली जाणार आहे. सेटसाठी आता ३५० गुणांसाठीच्या तीन प्रश्नपत्रिकांचे रुपांतर दोन प्रश्नपत्रिकांमध्ये करण्यात येणार आहे. पहिल्या प्रश्नपत्रिकेत ६० ऐवजी ५० प्रश्न तर दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत १०० प्रश्न असतील. प्रश्नपत्रिकेबरोबरच निकालाच्या पद्धतीतही काही बदल करण्यात आले आहेत. दोन प्रश्नपत्रिका दिलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार सहा टक्के उमेदवार पात्र ठरवले जाणार आहे. त्यानंतर दोन्ही प्रश्नपत्रिका मिळून खुल्या प्रवर्गसाठी किमान ४० तर आरक्षित प्रवगार्साठी ३५ टक्के गुण मिळवलेल्या उमेदवारांची यादी जाहिर केली जाणार आहे. सेट परीक्षेचा आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी व परीक्षेसंदर्भातील संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना http://setexam.unipune.ac.in/यासंकेतस्थळावर शुक्रवार(दि.२५) पासून उपबल्ध होणार आहे.