विंचूर येथील वाइन पार्कमध्ये कांदा निर्जलीकरण प्रकल्प साकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:22 AM2018-02-24T00:22:09+5:302018-02-24T00:22:09+5:30
कांदा उत्पादकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा राज्यातील सर्वात मोठा कांदा निर्जलीकरण प्रकल्प पॉलिसेटी सोमासुन्दरम एग्रोतर्फे लवकरच विंचूर येथील वाइन पार्कमध्ये ६० कोटी रुपयांची गुंतवणूक करून उभारण्यात येणार आहे. पॉलिसेटी सोमासुन्दरम एग्रो ही कंपनी कांदा व इतर भाज्यांकरता निर्जलीकरण प्रकल्प स्थापन करत आहे.
शेखर देसाई ।
लासलगाव : कांदा उत्पादकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा राज्यातील सर्वात मोठा कांदा निर्जलीकरण प्रकल्प पॉलिसेटी सोमासुन्दरम एग्रोतर्फे लवकरच विंचूर येथील वाइन पार्कमध्ये ६० कोटी रुपयांची गुंतवणूक करून उभारण्यात येणार आहे. पॉलिसेटी सोमासुन्दरम एग्रो ही कंपनी कांदा व इतर भाज्यांकरता निर्जलीकरण प्रकल्प स्थापन करत आहे. ज्याद्वारे १६०० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकºया निर्माण होतील आणि करार शेतीद्वारे ४० हजार शेतकºयांसह कांदा पुरवठा होण्यासाठी संलग्न होतील, असे समजते. या प्रकल्पात कांदा, लसूण, गाजर आणि बीट निर्जलीकरण करण्याच्या प्रकल्पाची उभारणी होणार आहे. या प्रक्रियेची क्षमता दरवर्षी ४० हजार मेट्रिक टन होईल.
विंचूर शहराचे भाग्य उजाळणार वाइनची राजधानी म्हणून ओळख असलेल्या विंचूर औद्योगिक वसाहतीमध्ये अन्नप्रक्रि या उद्योगाची ९५० कोटींची गुंतवणूक होणार आहे. या गुंतवणूकमुळे विंचूर शहराचे भाग्य उजळणार असून, पाच हजार रोजगारांची निर्मिती होण्याची शक्यता आहे. एकूण १५ अन्नप्रक्रि या उद्योगांनी मॅग्नेटिक महाराष्ट्र जागतिक उद्योजक परिषदेने सरकारशी करारबद्ध केले आहे. नाशिक शहरापासून सुमारे ६० किमी अंतरावर असलेल्या विंचूर वाइन पार्कच्या अगदी जवळ असलेल्या विंचूर फूड प्रोसेसिंग पार्कच्या परिसरात स्थित आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र जागतिक उद्योजक परिषदेमध्ये १५ कंपन्यांनी अन्नप्रक्रि या उद्योगासाठी तब्बल ९५० कोटी रु पये गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली आहे. दोन वर्षात या युनिट्सची सुरुवात होण्याची अपेक्षा आहे. जयंत अॅग्रो अॅण्ड फूड प्रोसेसिंग पुढील दोन वर्षात ६५० कोटी रु पयांच्या गुंतवणुकीसह फूड प्रोसेसिंग पार्कमध्ये दोन युनिट उभारत आहे. काही लहान उद्योग हे या पार्कमध्ये दोन कोटी आणि पाच कोटी रु पयांची गुंतवणूक करणार आहे. या युनिटमध्ये संगीता गौतम नील फूड, आर्य अॅग्रोटेक, आनंद सागर आॅइल मिल्स यांचा समावेश आहे. वंदना उद्योग २० कोटी रु पये गुंतवित आहे. च्शिवसाई एक्सपोर्ट १०० कोटी रु पयांच्या गुंतवणुकीद्वारे अन्नप्रक्रि या यंत्रणा उभारत आहे, ज्याद्वारे साडेतीन हजार लोकांना रोजगार मिळेल. याशिवाय, यात तीस हजार शेतकºयांना कंत्राटी शेतीचा समावेश असणार आहे.सध्या विंचूर एमआयडीसी पायाभूत सुविधांच्या विकासाची प्रक्रि या करीत आहे. या विकासावर प्रतिक्रि या देताना काही उद्योजकांनी सांगितले की, या पार्कमधील खाद्य प्रसंस्करण क्षेत्रातील नवीन गुंतवणूक नक्कीच स्थानिक शेतकºयांना मदत करेल. या गुंतवणुकीमुळे लासलगावसह विंचूर परिसराचे भाग्य उजाळणार आहे.