नेटप्रमाणेच सेटसाठीही होणार परीक्षा; प्रश्नपत्रिका व गुणात्मक रचनेत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 01:03 PM2018-09-10T13:03:53+5:302018-09-10T13:06:51+5:30

प्राध्यापक बनण्यासाठी अनिवार्य असलेल्या नेट व सेट परीक्षांमध्ये एकसारखेपणा आणण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असून त्यामुळेच नेट परीक्षेप्रमाणेच आता सेट परीक्षाही घेण्यात येणार आहे. त्यासाठी परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले असून नेटच्याच  धर्तीवर सेटचेही दोनच पेपर घेण्यात येणार आहे

Set as well as set for exam; The question paper for two hundred marks for the first one hundred and second paper | नेटप्रमाणेच सेटसाठीही होणार परीक्षा; प्रश्नपत्रिका व गुणात्मक रचनेत बदल

नेटप्रमाणेच सेटसाठीही होणार परीक्षा; प्रश्नपत्रिका व गुणात्मक रचनेत बदल

Next
ठळक मुद्देसेट परीक्षेच्या स्वरुपात बदल नेटच्या धर्तीवर होणार सेट परीक्षाप्रश्नपत्रिका व गुणात्मक रचनेत बदल

नाशिक : प्राध्यापक बनण्यासाठी अनिवार्य असलेल्या नेट व सेट परीक्षांमध्ये एकसारखेपणा आणण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असून त्यामुळेच नेट परीक्षेप्रमाणेच आता सेट परीक्षाही घेण्यात येणार आहे. त्यासाठी परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले असून नेटच्याच  धर्तीवर सेटचेही दोनच पेपर घेण्यात येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगामार्फ त वरिष्ठ महाविद्यालयाच्या सहायक प्राध्यापक पदासाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नेट परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फ त घेण्यात येणार असून आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच ही परीक्षा आॅनलाइन स्वरुपात घेण्यात येणार आहे. याच परीक्षेचा दर्जा व गुणवत्ता सेट परीक्षेतूनही पुढे यावी यासाठी महाराष्ट्र आणि गोवा राज्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फ त सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे (सेट) स्वरूप बदलले आहे.यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सेट परीक्षा घेण्यात येत असून नेट परीक्षेत झालेल्या बदलांमुळे सेट परीक्षेतही बदल करणे अनिवार्य असल्याचे स्पष्टीकरण पुणे विद्यापीठा अपरीहार्य असले तरी  सेट परीक्षा आॅफलाइन पद्धतीनेच होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

अशी होईल सेट परीक्षा
नेटच्या धर्तीवर होणाऱ्या सेट परीक्षेच्या तीन पेपरचे रूपांतर दोन पेपरमध्ये करण्यात  येणार असून ही परीक्षा ३०० गुणांसाठी घेण्यात येईल. पहिला पेपर १०० गुणांचा तर दुसरा पेपर २०० गुणांचा असेल. संपूर्ण राज्यात एकाच दिवशी ३ तासाच्या कालावधीत परीक्षा होईल. प्रश्नांच्या स्वरूपातही बदल करण्यात आला आहे. पहिल्या पेपरसाठी ६० ऐवजी ५० प्रश्नांचात समेवश करण्यात येणार असलला तरी हे सर्व प्रश्न सोडविणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर दुसरा पेपर हा पेपर दोन आणि पेपर तीन मिळून एकत्रित करण्यात येणार असून त्यात १०० प्रश्नांचा समावेश असणार आहे.  

Web Title: Set as well as set for exam; The question paper for two hundred marks for the first one hundred and second paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.