मृत कोंबड्याचा बंदोबस्त करा निवाणे नागरिकांची मागणी
By admin | Published: February 2, 2015 12:24 AM2015-02-02T00:24:12+5:302015-02-02T00:24:36+5:30
मृत कोंबड्याचा बंदोबस्त करा निवाणे नागरिकांची मागणी
Next
निवाणे : निवाणे परिसरात चणकापूर उजवा कालवा गेला असून, सदर कालव्यामार्फत देवळा तालुक्यातील दुष्काळी गावांना पिण्याचे पाणी रामेश्वर धरणात सोडले जाते भेंडीफाटा परिसरातील कालव्यात गेल्या काही दिवसापासून अज्ञात व्यक्ती शेकडो मृत कोंबड्या उजव्या कालव्या तसेच बाजूच्या खड्यात टाकून जात असल्याने सदर परिसरात कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतल्याने परिसरातील आश्रमशाळेचे विद्यार्थी व शेतकरी धास्तावले आहेत.