नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यावर बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 01:22 AM2017-07-25T01:22:35+5:302017-07-25T01:22:48+5:30

निफाड : सोमवारी तातडीने बंधाऱ्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पर्यटकांकडून बंधाऱ्यावर होणारी स्टंटबाजी रोखली.

Settle on Gods hostels in Nanduram | नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यावर बंदोबस्त

नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यावर बंदोबस्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
निफाड : नांदूरमधमेश्वर बंधाऱ्याच्या आठ गेटमधून विसर्ग सुरू असल्याने या बंधाऱ्याच्या खालील भागात गोदावरीला आलेला पूर उंच उडणाऱ्या लाटा पाहण्यासाठी येणारे काही पर्यटक स्टंटबाजी करीत असल्याचे वृत्त सोमवारी (दि.२४) प्रसिद्ध होताच तहसील प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन तातडीने प्रशासकीय सूत्रे फिरवली. सोमवारी तातडीने बंधाऱ्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पर्यटकांकडून बंधाऱ्यावर होणारी स्टंटबाजी रोखली.  निफाडचे प्रांत महेश पाटील यांनी सोमवारी तहसील प्रशासन , पोलीस प्रशासन ,जलसंपदा विभाग यांच्याशी संपर्क करून बंधाऱ्यावर सोमवारीच सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. सकाळी ८ वाजता निफाडचे तहसीलदार विनोद भामरे यांनी तातडीने नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यावर भेट दिली. सायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ए. एस. मोरे यांच्याशी चर्चा करून या ठिकाणी पोलीस पथक नेमण्याची कार्यवाही केली. पोलीस निरीक्षक मोरे स्वत: व ५पोलीस दिवसभर थांबून होते.


 

Web Title: Settle on Gods hostels in Nanduram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.