बंदोबस्तात उठविला बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 09:59 PM2020-04-21T21:59:09+5:302020-04-21T21:59:40+5:30
येवला : भाजीविक्रेत्यांसह शेतकऱ्यांची फरपट
येवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आठवडे बाजार बंद असले तरी मंगळवार येवल्याचा आठवडे बाजार असल्याने शहरानजीक महामार्गावर लागलेला भाजीपाला व फळबाजार पालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात उठवला.
सातत्याने पालिका प्रशासन भाजीपाला बाजारांच्या जागा व वेळा बदलत असल्याने भाजीपाला विक्र ेत्यांची फरफट होत आहे. महामार्गावरील भाजीपाला व फळविक्र ेते हटविण्याची मोहीम सकाळीच साडे नऊ-दहा वाजेच्या सुमारास पालिकेने पोलीस बंदोबस्तात राबविली. यात महामार्गावर द्राक्ष, टरबूज, पपई, काकडीसह भाजीपाला घेऊन आलेल्या तालुक्यातील शेतकरी वर्गाचीही फरफट झाली. काहींचे दुकान लागत असतानाच या मोहिमेमुळे ते बंद करावे लागले. या मोहिमेत शहरातील मेनरोडवर भरलेला भाजीपाला बाजारहीदेखील उठवल्या गेला.
भाजीपाला बाजारात गर्दी होत असल्याच्या व यात सोशल डिस्टन्सिंग पाळला जात नसल्याच्या तक्र ारी सोशल मीडियावरून होत होत्या. त्यामुळे पालिकेने ही मोहीम राबविल्याचे सांगितले जाते. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासन, पोलीस व महसूल विभागाने संयुक्तपणे नियोजन करणे आवश्यक असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.