ओझर ग्रामपंचायतकडून मोकाट श्वानांचा बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 03:20 PM2020-01-17T15:20:59+5:302020-01-17T15:21:12+5:30
ओझर : गावातील मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याचे काम ग्रामपंचायतीने सुरू केले आहे. यामुळे नागरिकांचा त्रास कमी होणार आहे.
ओझर : गावातील मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याचे काम ग्रामपंचायतीने सुरू केले आहे. यामुळे नागरिकांचा त्रास कमी होणार आहे. गावातील मोकाट श्वानांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या ही ओझरकरांची डोकेदुखी झाली होती. इतर ठिकाणची कुत्री पकडून मुंबई-आग्रा महामार्गावर रात्री आणून सोडली जातात. त्यामुळे भटक्या श्वानांची संख्या प्रचंड वाढली आहे. यामुळे रस्त्याने चालणेदेखील कठीण झाले आहे. या श्वानांनी काही मुले व नागरिकांना चावा घेऊन जखमी केले होते. यामुळे प्रत्येक ग्रामसभेत भटक्या श्वानांच्या समस्येवर उपाय करावा, अशी मागणी केली जात होती. यावर उपाय म्हणून ग्रामपंचायतीने बीड जिल्ह्यातील डॉ. हनुमंत शेळके यांच्या युनिव्हर्सल अॅनिमल वेल्फेयर संघटनेला भटकी श्वान पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याचे काम दिले. ते दिवसाला साधारणत: २० श्वान पकडून त्यांचे निर्बीजीकरण करून त्यांना दोन दिवस ठेवतात. यानंतर त्यांना अँटी रेबीज लस देऊन पुन्हा सोडले जाते. या कामी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पवार हे सहाय्य करीत आहेत. यासाठी ग्रामपंचायतीने गावाबाहेर एक पत्र्याचे शेड बांधून दिले आहे. यामुळे श्वानांची संख्या नियंत्रणात राहील, अशी अपेक्षा आहे. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.