निमा निवडणुकीत सिन्नरच्या दोन जागांवर समझोता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:55 AM2018-07-25T00:55:15+5:302018-07-25T00:55:29+5:30
निमा निवडणुकीत मंगळवारी नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. बॅनर्जी-खरोटे यांच्या एकता पॅनल आणि उद्योग विकास पॅनलने सिन्नरच्या दोन जागांसाठी समझोता करून राठी-नहार यांच्या एकता पॅनलला धक्का दिला आहे. सिन्नर वगळता अन्य जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.
सातपूर: निमा निवडणुकीत मंगळवारी नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. बॅनर्जी-खरोटे यांच्या एकता पॅनल आणि उद्योग विकास पॅनलने सिन्नरच्या दोन जागांसाठी समझोता करून राठी-नहार यांच्या एकता पॅनलला धक्का दिला आहे. सिन्नर वगळता अन्य जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.
नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या द्वैवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी एकता पॅनलच्या विरोधात उद्योग विकास पॅनल लढण्यासाठी सज्ज झाले होते. त्यामुळे एकता पॅनलमध्ये फूट पडू नये म्हणून तब्बल नऊ दिवस चर्चेचे गुºहाळ सुरू होते. तरीही एकमत न झाल्याने अखेर एकतामध्ये फूट पडून दोन गट तयार झाले आहेत. एकता पॅनलमध्ये फूट पडल्याने हरिशंकर बॅनर्जी-उदय खरोटे यांचे एकता पॅनल, किशोर राठी -आशिष नहार यांचेही एकता पॅनल आणि उद्योग विकास पॅनल अशा तीन पॅनलमध्ये सरळसरळ लढत होत आहे. तीन पॅनलमध्ये सरळसरळ निवडणूक होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले असताना सोमवारी माघारीच्या दिवशी रात्री उशिरा नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. सिन्नरसाठीच्या अतिरिक्त उपाध्यक्ष पदासाठी पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते. माघारीच्या दिवशी सोमवारी बॅनर्जी-खरोटे यांच्या एकता पॅनल आणि उद्योग विकास पॅनल यांच्यात झालेल्या समझोत्यानुसार अरु ण चव्हाणके, शिवाजी आव्हाड, डी. जी. ढोबळे यांनी नाट्यमयरीत्या माघार घेऊन आता उद्योग विकास पॅनलचे एम. जी. कुलकर्णी आणि राठी-नहार यांच्या एकता पॅनलचे सुधीर बडगुजर यांच्यात लढत होणार आहे, तर सिन्नरच्या अतिरिक्त सचिव पदासाठीदेखील राठी-नहार यांच्या पॅनलचे किरण खाबिया आणि बॅनर्जी-खरोटे यांच्या पॅनलचे संदीप भदाणे यांच्यात सरळसरळ लढत होणार आहे. सिन्नरच्या या दोन्ही जागांसाठी राठी-नहार यांच्या पॅनलच्या विरोधात दोनही पॅनलने गटबंधन केले असल्याचे सांगण्यात आले आहे. सिन्नर, सातपूर, अंबड येथील मतदारांची संख्या मोठी असल्याने या मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रयत्न जात आहे. सिन्रला ६५७ मतदार, अंबडला १००७, सातपूरला ७१६, नाशिक परिसर ४३७, दिंडोरी ५८, इगतपुरी ३७, इतर ५३ असे २९६५ मतदार आहेत.