मांडवड उपोषणाची चौथ्या दिवशी सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 01:05 AM2018-11-30T01:05:31+5:302018-11-30T01:06:25+5:30

नांदगांव : मांडवड येथील उपोषणकर्त्यांना त्यांच्या मागण्यांची कालबद्द पद्धतीने पूर्तता करण्यात येईल असे लेखी आश्वासन तहसीलदार भारती सागरे यांनी ...

Settling on the fourth day of Mandawati fasting | मांडवड उपोषणाची चौथ्या दिवशी सांगता

प्रांत भीमराज दराडे व तहसीलदार भारती सागरे मांडवड ग्रामस्थांना उपोषण सोडण्याचा आग्रह करतांना.

Next
ठळक मुद्देनांदगांव : मांडवड येथील उपोषणकर्त्यांना त्यांच्या मागण्यांची कालबद्द पद्धतीने पूर्तता करण्यात येईल असे लेखी आश्वासन तहसीलदार भारती सागरे यांनी दिल्यानंतर गुरुवारी चौथ्या दिवशी उपोषणाची सांगता झाली. प्रांत भीमराज दराडे यांनी मांडवड येथे तहसीलदारांसमवेत जाऊ

नांदगांव : मांडवड येथील उपोषणकर्त्यांना त्यांच्या मागण्यांची कालबद्द पद्धतीने पूर्तता करण्यात येईल असे लेखी आश्वासन तहसीलदार भारती सागरे यांनी दिल्यानंतर गुरुवारी चौथ्या दिवशी उपोषणाची सांगता झाली. प्रांत भीमराज दराडे यांनी मांडवड येथे तहसीलदारांसमवेत जाऊन सविस्तर चर्चा केली. ज्या मुद्द्यामुळे आंदोलन चार दिवस सुरू होते त्या रेशन दुकानदारांचे परवाने रद्द करण्याचा ग्रामस्थांचा कळीचा मुद्दा मान्य न होताच आंदोलन मागे घेण्यात आले. रद्दचा चेंडू जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या कोर्टात गेला.
तहसीलदार सागरे यांनी दि. १५ डिसेंबर रोजी शिबिर लावून नवीन, दुय्यम, विभक्त अशी रेशनकार्ड्स व त्या संदर्भातील तक्र ारी यांचे निराकरण करणे, ग्रामपंचायतीस पात्र स्वस्त धान्य लाभार्थींची यादी शिबिराच्या दिवशी उपलब्ध करून देणे, बीपीएल, पांढरे, अंत्योदय रेशन कार्डधारकांच्या याद्या त्याच दिवशी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिले.

Web Title: Settling on the fourth day of Mandawati fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार