पिंपळगांव लेप येथील साडेतीन दिवसीय सप्ताहाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 07:16 PM2019-04-14T19:16:13+5:302019-04-14T19:16:51+5:30
मानोरी : येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील नव्याने उभारण्यात आलेले राम मंदिर परिसरात साडेतीन दिवशीय सप्ताहाची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली.
मानोरी : येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील नव्याने उभारण्यात आलेले राम मंदिर परिसरात साडेतीन दिवशीय सप्ताहाची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली.
या कालावधीत मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून तीन दिवस महायज्ञ आयोजित केला होता. त्यात पिहल्या दिवशी मुर्ती मिरवणूक मंडल स्थापना, जलपुजन, दुसऱ्या दिवशी प्रदान हवन, मूर्तीची स्थापना, विधी १०८ प्रकारचे स्नान, धान्य दिवस, तिसºया दिवशी प्रदान हवन, मूर्ती स्थापना, पुर्णा आहुती व कलशारोहण करण्यात आले होते. तसेच गणपती, संत ज्ञानेश्वर, राधा-कृष्ण, सिता-राम, लक्ष्मण, हनुमान, गंगामाता, नंदीकिश्वर आदी विविध देवतांच्या मुर्ती स्थापना करण्यात आल्या आहे. तसेच तीन दिवस पुजेसाठी २१ जोडपी बसविण्यात आली होती. या निमित्ताने तीन दिवस रोजकाकडा, भजने, गाथा, कीर्तने, हरीपाठ यांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी परमेश्वर महाराज जायभावे, अशोक महाराज सत्रे, सागर महाराज भालेराव यांचे कीर्तन झाले, तर रविवारी (दि.१४) बाळोबा महाराज वाकचौरे यांच्या काल्याचे कीर्तनाने महाप्रसादानंतर सप्ताहाची सांगता झाली.