सेतू अभ्यासक्रमाची वारी विद्यार्थ्यांच्या द्वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:11 AM2021-07-16T04:11:48+5:302021-07-16T04:11:48+5:30

दिंडोरी : येथील जनता इंग्लिश स्कूलमध्ये ग्रामीण भागातून परिसरातील खेड्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाबाबत रेंजच्या येणाऱ्या अडचणी लक्षात घेत ...

Setu syllabus by students | सेतू अभ्यासक्रमाची वारी विद्यार्थ्यांच्या द्वारी

सेतू अभ्यासक्रमाची वारी विद्यार्थ्यांच्या द्वारी

Next

दिंडोरी : येथील जनता इंग्लिश स्कूलमध्ये ग्रामीण भागातून परिसरातील खेड्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाबाबत रेंजच्या येणाऱ्या अडचणी लक्षात घेत शाळेच्या वतीने ‘सेतू अभ्यासक्रमाची वारी आपल्या द्वारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर ‘शाळा बंद; पण शिक्षण सुरू’ या उपक्रमांतर्गत ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षण सुरू असून, याच उपक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना मागील वर्षीच्या इयत्तेच्या क्षमता विकसित करण्यासाठी पायाभूत शिक्षण मिळण्यासाठी शासनाच्या वतीने ४५ दिवसांचा सेतू अभ्यास सुरू करण्यात आलेला आहे. या उपक्रमाबाबत सूक्ष्म नियोजन करून प्राचार्य आर.सी. वडजे यांनी इयत्ता पाचवी ते दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात शिक्षकांची टीम तयार करून खास पालक व विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शासनाच्या सेतू अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी, तसेच दिलेला अभ्यास व स्वाध्याय तपासणी करण्यासाठी ‘अभ्यासाची वारी आपल्या द्वारी’ हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती वडजे यांनी दिली.

ज्या गावात कोविड-१९ चे रुग्ण नाहीत व पालकांच्या अनुमतीने ग्रामीण भागातील कोविडचे सर्व नियम पाळून मंदिरे, सभामंडप व शाळा याठिकाणी शिक्षक विद्यार्थ्यांना एकत्र करत मार्गदर्शन करत आहेत. या उपक्रमास उपमुख्याध्यापक यू.डी. भरसट, पर्यवेक्षक यू.डी. बस्ते यांनी उपस्थित राहून विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.

------------------------

शिक्षकांचा गट

विद्यालयातील शिक्षकांच्या गटांनी पाचवी ते दहावी एकूण ३८९ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या उपक्रमाचे परिसरातील गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, संस्थेचे सभासद व ग्रामस्थांनी कौतुक करून उपक्रमास शुभेच्छा दिल्या. या उपक्रमात माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक सहभागी झाले आहेत.

------------------

दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलच्या वतीने ‘सेतू अभ्यासाची वारी आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यालयाचे प्राचार्य आर.सी. वडजे. (१५ दिंडोरी १)

150721\15nsk_1_15072021_13.jpg

१५ दिंडोरी १

Web Title: Setu syllabus by students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.