चांदोरी बनावट दारू छाप्यात सात जणांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 11:18 PM2021-10-13T23:18:56+5:302021-10-13T23:18:56+5:30
ओझर : चांदोरी येथील उदयराजे लॉन्समध्ये सुरू असलेल्या अवैध दारू बनवण्याच्या अड्ड्यावर सोमवारी (दि.११) जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी धाड टाकत तो उद्ध्वस्त केला होता. त्यानंतर याबाबत संबंधित असलेल्या संशयितांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक करण्यात आली होती. आरोपींना निफाड न्यायालयात उभे केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अटक करून कोठडी सुनवण्यात आलेले आरोपींमध्ये संजय मल्हारी दाते, रा.गोंडेगाव ता.निफाड, अंबादास विठोबा खरात (६५) रा.चांदोरी शिवार ता.निफाड, शुभम काशिनाथ शिंदे (२०) रा.शिरूड ता.जि. धुळे, सुरेश सुधाकर देवरे (२१) रा.जुनवणे ता.जि. धुळे, दीपक पुंडलिक पाटील (५५) रा. देवपूर धुळे, पंकजकुमार देवेंद्र मंडल (२०), रा. सिरसिया ता. भरगामा जि. आरठिया (बिहार राज्य), मणिकांतकुमार सूरज मंडल (१९) रा.सिरसिया ता. भरगामा जि.आरठिया (बिहार) यांचा समावेश आहे. सदर गुन्ह्यातील धुळे येथील फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना लवकरच अटक केली जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.