भाजपाच्या सात नगरसेवकांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 12:45 AM2019-11-17T00:45:26+5:302019-11-17T00:46:20+5:30

महापालिकेत सत्ता असली तरी राजी-नाराजी आणि त्यातच काही जण माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे समर्थक असल्याने भाजपचे सात नगरसेवक संपर्क क्षेत्राबाहेर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 Seven BJP corporators stalked | भाजपाच्या सात नगरसेवकांची दांडी

भाजपाच्या सात नगरसेवकांची दांडी

Next

नाशिक : महापालिकेत सत्ता असली तरी राजी-नाराजी आणि त्यातच काही जण माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे समर्थक असल्याने भाजपचे सात नगरसेवक संपर्क क्षेत्राबाहेर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातील नाशिकरोड येथील एका नगरसेवकाने आमदार आणि शहराध्यक्ष यांनी एकत्रित जाऊनदेखील प्रतिसाद दिला नसल्याचे वृत्त आहे. शनिवारी (दि.१६) घडलेल्या या घडामोडींनी भाजपची चिंता वाढली आहे.
महापालिकेत भाजपचे ६५ नगरसेवक असून, पक्षाला पूर्ण बहुमत आहे. मात्र तीन वर्षांत भाजपाअंतर्गत बऱ्याच घडामोडी झाल्या असून, त्याचे पडसाद महापौरपदाच्या निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे. गेल्या तीन वर्षांतील गटबाजी आणि त्यानंतर बाळासाहेब सानप यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी केलेले पक्षांतर या सर्व राजकीय घडामोडी आता अडचणीच्या ठरल्या आहेत. त्यातच राज्यात सत्ता असेल तर अडचण नव्हती, परंतु आता ती शक्यता दिसत नसल्याने अनेक आयाराम हे फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच भाजपने सहलीचा घाट घातला असला तरी त्यातदेखील अडचणी आल्या आहेत. केवळ ४८ नगरसेवक दौºयावर गेले आहेत. उर्वरित काही नगरसेवक गेले नसले तरी त्यातील मच्छिंद्र सानप, सुनीता पिंगळे, प्रियांका माने, सुमन सातभाई, कमलेश बोडके, पूनम धनगर, विशाल संगमनेरे हे नगरसेवक दौºयावर गेले नाहीत. त्यामुळे सानप समर्थकांचा शिक्का असलेले हे नगरसेवक सहलीला न गेल्याने त्यांच्याविषयी भाजपातच चर्चा सुरू झाली. अर्थात यात तथ्य नसल्याचे सांगण्यात आले. तरीही यातील एका नगरसेवकाकडे भाजपचे आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले आणि भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी प्रत्यक्ष जाऊन त्यांना बरोबर घेण्यासाठी प्रयत्न केले, परंतु त्यांनी नकार दिला. अर्थात यातील काही नगरसेवकांनी माध्यमांशी बोलताना प्रकृती अस्वास्थ आणि व्यवसाय अशी कारणे सांगितली आहेत, तर कमलेश बोडके यांनी पक्षातील कोणत्याही मूळ भाजप नगरसेवक असेल त्यालाच महापौरपदाची संधी द्यावी, अशी मागणी केली. व्यवसायामुळे त्यांनी सहलीवर जाण्याबाबत असमर्थता व्यक्त केली, मात्र पक्षाबरोबरच असल्याचे त्यांनी सांगितले. अशाप्रकारे अनेकांनी कारणे सांगितली. मच्छिंद्र सानप हे माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे चिरंजीव आहेत. त्यामुळे ते पक्षाबरोबर राहतील किंवा नाही याविषयी वेगळे सांगण्याची गरज नाही.
तीन नगरसेविकांनी तर वैद्यकीय कारण दिले असून, त्यामुळे पक्षांवर त्यांना विश्वास ठेवावा लागला आहे. सर्व जण भाजपबरोबरच आहेत असे सभागृह नेते सतीश सोनवणे सांगत असले तरी प्रत्यक्षात किती नगरसेवक पक्षाबरोबर राहतील हे आज सांगणे अशक्य असल्याचेच दिसत आहे.
शिवसेनेचे नगरसेवकही भाजपच्या संपर्कात
भाजप आणि शिवसेनेच्या वतीने सत्ता स्पर्धा वाढत आहे. बाळासाहेब सानप हे शिवसेनेत दाखल झाल्याने ते भाजपने उमेदवारी नाकारल्याचा आणि आपल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी राजकीय समीकरणे बदलवतील, असे सांगितले जात आहे. त्यामुळे भाजपला खरी चिंता आहे. मात्र दुसरीकडे शिवसेनेचे दहा ते बारा नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा भाजपच्या एका इच्छुकाने केल्याने दोन्ही पक्षात संशय वाढत चालला आहे.
संकटमोचकाची प्रतीक्षा
भाजपचे किंबहूना सरकारचे संकटमोचक असलेल्या माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर बरीच भिस्त आहे. शनिवारी (दि.१६) ते नाशिकमध्ये नव्हते. मात्र त्यांनी अनेक नगरसेवकांशी दूरध्वनीवरून चर्चा केली असे सांगण्यात आले. पक्षाचे उत्तर महाराष्टÑ संघटनमंत्री किशोर काळकरदेखील आता नाशिकमध्ये दाखल होत आहे.

Web Title:  Seven BJP corporators stalked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.