शहरात सात कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 11:06 PM2020-05-11T23:06:03+5:302020-05-11T23:25:08+5:30
नाशिक : जिल्ह्यात आणि शहरात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असल्याने गंभीर परिस्थिती व्यक्त होत असताना आता बरे होणाऱ्यांच्या प्रमाणातदेखील वाढ होत आहे. अर्थात, त्यासाठी बदललेले निकषदेखील कारणीभूत ठरले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात तीनच कोरोनाबाधित होते. मात्र, आता हेच प्रमाण वाढले असून, रविवारी (दि.१०) एकाच दिवशी ७ जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे यापूर्वीचे तीन आणि रविवारचे सात असे एकूण १० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. येत्या काही दिवसांत शहरातील आणखी दहा ते बारा जण कोरोनामुक्त होणार आहेत.

नाशिक शहरात सध्या कोरोनाबाधितांची संख्या किती यावरून जिल्हा प्रशासन आणि महापालिकेत मतभेद असले तरी सध्या ३७ रुग्णांची महापालिकेच्या दफ्तरी नोंद आहे. मार्चअखेरीस निफाड येथे पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर नाशिक शहरात पहिला रुग्ण गोविंदनगर भागात आढळला होता. त्यानंतर आनंदवली येथील नवश्या गणपती भागात तर त्यानंतर धोंडगे मळा येथे एका पोलीस अधिकाºयाला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळले होते. त्यानंतर ही संख्या दिवसेंदिवस वाढतच गेली. पहिले तीन रुग्ण कोरोनामुक्त होऊन पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लोटला आहे. मात्र, त्यानंतर शहरातील रुग्ण बरे होत नसल्याचे दिसत असल्याचे आहे. त्यामुळे अनेक शंका घेतल्या जात होत्या. मालेगावसारख्या ठिकाणी रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या वाढत असताना शहरात मात्र ही संख्या कमी असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. परंतु, केंद्र शासनाच्या आरोग्य खात्याने यासंदर्भात आता अनेक नियम शिथिल केल्याने आता रुग्ण बरे झाल्यानंतरही त्यांना विविध चाचण्यांनंतरच घरी सोडण्याचे प्रमाण वाढले आहे.
-------
यापूर्वीच्या चाचण्या आणि अन्य नियमात केंद्र शासनाने बदल केले आहेत. माईल्ड, व्हेरी माईल्ड आणि लक्षणे नसलेले अशी नवी विगतवारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता अशा रुग्णांना लवकरच घरी पाठविणे शक्य होणार आहे, अशी माहिती मनपाच्या कोरोना सेलचे प्रमुख डॉ. आवेश पलोड यांनी दिली.