वाटले सतराशेसाठ कोटी, वसुली फक्त शंभर कोटींची

By admin | Published: March 26, 2017 12:15 AM2017-03-26T00:15:27+5:302017-03-26T00:15:58+5:30

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या वतीने चालू आर्थिक वर्षात सुमारे सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना १७५० कोटींचे पीककर्ज वाटप करण्यात आले

Seven hundred crores of rupees, recoveries amounted to only 100 crores | वाटले सतराशेसाठ कोटी, वसुली फक्त शंभर कोटींची

वाटले सतराशेसाठ कोटी, वसुली फक्त शंभर कोटींची

Next

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या वतीने चालू आर्थिक वर्षात सुमारे सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना १७५० कोटींचे पीककर्ज वाटप करण्यात आले असून, मार्चच्या मध्यापर्यंत केवळ १०० कोटींचीच वसुली झाल्याने बॅँकेची आर्थिक स्थिती बिकट होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, जिल्हा बॅँकेने वेळेत पीककर्जाची थकबाकी न भरणाऱ्या सभासदांची नावे वृत्तपत्रात देण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी फोटो लावण्याचा इशारा दिल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त करण्यात येत असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे वाटप केलेल्या कर्जाची वेळेत वसुली न केल्यास अनुत्पादक मालमत्ता (एन.पी.ए.) वाढल्यास रिझर्व्ह बॅँकेने जिल्हा बॅँकेवर सहकार कायदा कलम ११० च्या कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्हा बॅँकेला वसुलीसाठी तगादा लावल्यास शेतकऱ्यांची नाराजी आणि वसुली थांबल्यास रिझर्व्ह बॅँकेची कारवाई असा इकडे आड तिकडे विहीर असल्याचा प्रकार जिल्हा बॅँकेसमोर उभा ठाकला आहे. जिल्हा बॅँकेने चालू आर्थिक वर्षात सुमारे सव्वादोन लाख शेतकरी सभासदांना सुमारे १७५० कोटींचे पीककर्ज वाटप केले आहे. या कर्जाची परतफेड ३० जून २०१७ अखेर होणे अपेक्षित आहे. मात्र आता मार्च सुरू झाला तरी या १७५० कोटींपैकी अवघी १०० कोटींची पीककर्ज वसुली झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. जिल्हा बॅँकेच्या प्रशासनाने नुकतेच एक प्रसिद्धीपत्रक काढून राज्य सरकारने नुकताच अर्थसंकल्प सादर केला असून, त्यात शेतकऱ्यांसाठी कुठलीही कर्जमाफी नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या अपेक्षेवर न राहता नियमित घेतलेल्या पीककर्जाची परतफेड करावी, अन्यथा कर्जदारांवर नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. आता उर्वरित तीन महिन्यांत जिल्हा बॅँकेला १६५० कोटी रुपयांची पीककर्ज वसुली करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Seven hundred crores of rupees, recoveries amounted to only 100 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.