ट्रॅक्टर तलावात उलटून सात मजूर महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:54 AM2017-10-25T00:54:11+5:302017-10-25T00:54:16+5:30

तालुक्यातील अजंग - दाभाडी रस्त्यावर ढवळीविहीर तलावात मंगळवारी (दि. २४) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर (एमएच ४१ ७६७१) ट्रॉलीसह तलावात उलटल्याने सात महिलांचा बुडून मृत्यू झाला, तर ट्रॅक्टरचालकासह तेरा महिला गंभीर जखमी झाल्या. जखमींवर मालेगाव येथील सामान्य व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील सर्व मृत वडेल येथील होते. त्यामुळे वडेल गावावर शोककळा पसरली आहे. रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते.

 Seven laborers killed in tractor pond, killed women | ट्रॅक्टर तलावात उलटून सात मजूर महिला ठार

ट्रॅक्टर तलावात उलटून सात मजूर महिला ठार

googlenewsNext

मालेगाव : तालुक्यातील अजंग - दाभाडी रस्त्यावर ढवळीविहीर तलावात मंगळवारी (दि. २४) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर (एमएच ४१ ७६७१) ट्रॉलीसह तलावात उलटल्याने सात महिलांचा बुडून मृत्यू झाला, तर ट्रॅक्टरचालकासह तेरा महिला गंभीर जखमी झाल्या. जखमींवर मालेगाव येथील सामान्य व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील सर्व मृत वडेल येथील होते. त्यामुळे वडेल गावावर शोककळा पसरली आहे. रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते.  अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. त्यांनी अग्निशमन दलालाही  पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित तलावात पडलेल्या महिलांना बाहेर काढले. ग्रामस्थांनी मिळेल त्या वाहनाने जखमींना मालेगावी सामान्य रुग्णालयात हलविले. रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाचे जवान तलावात बुडालेल्या महिलांचे मृतदेह काढण्याचे काम करत होते. अंधारामुळे मदतकार्यास अडथळा निर्माण होत  होता.  मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी मदत कार्य तातडीने केल्यामुळे अपघातातील जखमींना प्रारंभी अजंग वडेल येथील डॉ. बागडे व डॉ. सोनवणे यांनी प्रथमोपचार करुन अधिक उपचारासाठी सामान्य रूग्णालयात पाठविले. जखमींवर शहरातील खासगी रूग्णालयांसह सामान्य रूग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत.  दिवाळीनंतर आज पहिल्याच दिवशी वडेल येथील मजुर महिला ढवळीविहीर शिवारात मोहन कारभारी अहिरे यांच्या शेतात कांदा लागवडीसाठी गेल्या होत्या. कांदा लागवडीचे काम आटोपून संध्याकाळी ट्रॅक्टरने घराकडे परतत असताना अजंग-दाभाडी रस्त्यावरील ढवळीविहीर शिवारातील तलावात ट्रॅक्टर उलटल्याने ट्रॅक्टरसह महिला २५ ते ३० फुट तलावात बुडाले. यात निकिता रमेश सोनवणे (१७) ही मुलगी पाण्यातून सर्वात आधी बाहेर आली. तिने आरडाओरड करण्यास सुरूवात केली. त्यानंतर आजूबाजूच्या शेतातील शेतकरी घटनास्थळी मदतीसाठी दाखल झाले. मिथून गोविंद या रिक्षा चालकाने काही जखमींना सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तलावात बुडालेल्या अपघातग्रस्त काही महिला बेशुद्ध पडल्या. मृतांमध्ये रोहिणीबाई रतन शेलार, संगीता गोवर्धन भदाणे, उषा गणेश भदाणे, आशाबाई जगन मळके, सुनंदा रघुनाथ शेलार, संगीता किशोर महाजन, रंजना किसन महाले यांचा समावेश आहे. तर या भीषण अपघातात बचावलेल्या जखमी महिलांमध्ये ताईबाई अभिमन मांडवडे, गायत्री अभिमन मांडवडे या दोघा बहिणींसह वंदना रमेश सोनवणे, सुवर्णा अनिल बंद्रे, कमल प्रकाश गोविंद, निर्मला बारकू सावळे, लताबाई नाना शेलार, शहाबाई सुभाष शेलार, नवलेआई लक्ष्मण शेलार, संगीता शाम बोरसे, लताबाई नानाभाऊ शेलार, कल्पना दगडू शेलार आदिंचा समावेश आहे. या भीषण अपघाताचे वृत्त कळताच घटनास्थळी व वडेल येथे भाजपाचे महानगर प्रमुख सुनील गायकवाड, शिवसेना तालुकाध्यक्ष संजय दुसाने, बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे, प्रमोद शुक्ला, लकी गिल, राजेश अलिझाड यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकाºयांनी धाव घेवून जखमींचे व मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. एकाच गावातील सात महिलांवर काळाने झडप घातल्यामुळे वडेल परिसरात शोककळा पसरली होती. मयतांच्या नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला होता. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
मुख्यमंत्र्यांचे मदतीचे आश्वासन
ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांना मुंबईत या भीषण अपघाताचे वृत्त समजल्यानंतर त्यांनी
तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट  घेऊन त्यांना निवेदन सादर केले. घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना व जखमींना आर्थिक मदत देण्याची मागणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त करीत आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले,  असे राज्यमंत्री भुसे यांनी दूरध्वनीवरून ‘लोकमत’ला सांगितले.
निकिताने वाचविले पाच महिलांचे प्राण
ट्रॅक्टरमधील मजुरांमध्ये निकिता सोनवणे या सतरावर्षीय मुलीचा समावेश होता. तलावात ट्रॅक्टर पडला त्यावेळी निकिता कशीबशी पोहून तलावाच्या काठावर आली. तिने बाहेर येताच तलावात बुडणाºया पाच महिलांना पाण्याबाहेर काढून त्यांचे
प्राण वाचविले.

Web Title:  Seven laborers killed in tractor pond, killed women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.