जेलरोडला सात लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 10:14 PM2020-07-14T22:14:04+5:302020-07-15T01:12:18+5:30

नाशिकरोड : जेलरोड त्रिवेणी पार्क येथील बोरकर नर्सिंगहोमचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने टेबलच्या ड्रॉवरमधून सात लाखांची रोकड चोरून नेली. बिटको कॉलेजमागील शांतीउदय सोसायटीत राहणारे कुलदीप सिंग, प्रदीप कुमार बोरकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जेलरोड येथील त्रिवेणी पार्क, इंद्रकुटी अपार्टमेंटमध्ये त्यांचे बोरकर नर्सिंग होम दवाखाना आहे.

Seven lakhs stolen from Jail Road | जेलरोडला सात लाखांची चोरी

जेलरोडला सात लाखांची चोरी

googlenewsNext

नाशिकरोड : जेलरोड त्रिवेणी पार्क येथील बोरकर नर्सिंगहोमचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने टेबलच्या ड्रॉवरमधून सात लाखांची रोकड चोरून नेली.
बिटको कॉलेजमागील शांतीउदय सोसायटीत राहणारे कुलदीप सिंग, प्रदीप कुमार बोरकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जेलरोड येथील त्रिवेणी पार्क, इंद्रकुटी अपार्टमेंटमध्ये त्यांचे बोरकर नर्सिंग होम दवाखाना आहे. रविवारी दुपारी दीड वाजता दवाखान्याची दोन्ही शटर व बाहेरील लोखंडी ग्रील व्यवस्थित बंद करून ते घरी गेले. सोमवारी सकाळी दवाखान्यात काम करणाऱ्या सुरेखा मावशी या दवाखान्यात आल्या असता त्यांना दवाखान्याच्या ग्रीलचे गज वाकलेले व शटर उचकटलेले दिसले. सुरेखा मावशी यांनी तत्काळ बोरकर यांना या घटनेची माहिती दिली. बोरकर लागलीच दवाखान्यात आले असता त्यांना दवाखान्यात चोरी झाल्याचे लक्षात आले. अज्ञात चोरट्यांनी दवाखान्याचे ग्रीलचे गज वाकवून शटर उचकटवून दवाखान्यात प्रवेश केला. कन्सल्टिंगरूममधील टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली सात लाखांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दुचाकीची डिक्की फोडली
डीजीपीनगर येथील साईकृपा अपार्टमेंटमधून दुचाकी गाडी चोरी करून डिक्की फोडून ७५०० रु पये रोख व महत्त्वाचे कागदपत्रे चोरल्याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. डीजीपीनगर संतोषी मातानगर येथील साईकृपा अपार्टमेंटमध्ये राहणाºया जुनेद नूर मोहम्मद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी मध्यरात्री इमारतीच्या पार्किंगमध्ये दुचाकी (एमएच १५ डीबी ८१८३) लावली होती. अर्ध्या तासानंतर कामानिमित्त बाहेर जायचे असल्याने इमारतीच्या पार्किंगमध्ये आलो असता दुचाकी दिसली नाही. शेख यांनी त्याच इमारतीत राहणारे सलिमभाई यांच्यासोबत आजूबाजूच्या परिसरात सर्वत्र दुचाकीचा शोध घेतला, परंतु दुचाकी मिळून आली नाही. सोमवारी सकाळी शेख यांनी सोनू खान यांना दुचाकीचोरी गेल्याबाबतची माहिती सांगितली.
रात्री पार्किंगमध्ये दुचाकी लावत असताना सुलतान खान व टिपू चांद सय्यद सदर हे त्या परिसरात होते. त्या दोघा संशयितांनी शेख यांची दुचाकी चोरून तिची डिक्की तोडून असलेल्या पाकिटातील साडेसात हजार रु पये रोख, पॅनकार्ड व इतर महत्त्वाचे कागदपत्रे चोरून नेले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनगर पोलिस करीत आहेत. दरम्यान परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Seven lakhs stolen from Jail Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक