करंजवणच्या उपसरपंचासह सात सदस्यांचे राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:12 AM2021-06-04T04:12:48+5:302021-06-04T04:12:48+5:30

या राजीनामे सत्राला ग्रामविकास अधिकारी अरुण आहेर जबाबदार असल्याचा आरोप उपसरपंच रवींद्र मोरे, सदस्य नानासाहेब ...

Seven members including Karanjavan's sub-panch resign | करंजवणच्या उपसरपंचासह सात सदस्यांचे राजीनामे

करंजवणच्या उपसरपंचासह सात सदस्यांचे राजीनामे

Next

या राजीनामे सत्राला ग्रामविकास अधिकारी अरुण आहेर जबाबदार असल्याचा आरोप उपसरपंच रवींद्र मोरे, सदस्य नानासाहेब पोपट शार्दुल, विजय तुलशीराम गांगोडे, श्रीपत कचरू खराटे, रामनाथ संपतराव चतुर, मंगला रंगनाथ वासले, लीलाबाई आनंदाराव गांगोडे, सुरेखा शिवाजी मोरे व दिंडोरी पं. समिती सदस्या मालताताई खराटे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे.

गेल्या कित्येक महिन्यांपासून करंजवण ग्रामपालिकेत उपसरपंच व सदस्य विरुद्ध ग्रामविकास अधिकारी असा संघर्ष निर्माण झाला असून ग्रामविकास अधिकारी उपसरपंच व सदस्यांना विश्वासात घेत नसल्याची तक्रार विस्तार अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह जि. प. सदस्य, प. समिती सदस्य यांच्याकडे तक्रार दखल घेतली जात नाही. गेल्या बारा वर्षांपासून सदर ग्रामविकास अधिकारी करंजवण येथे कार्यरत आहेत. सदर ग्रामविकास अधिकारी हे जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष असल्यामुळे माझे कुणी काही करू शकत नाही, अशा धमक्याही देत असल्याचे सांगण्यात आले.

इन्फो

ग्रामपंचायत बरखास्तीची मागणी

करंजवण ग्रामपालिकेची मुदत दोनच महिने बाकी आहे. त्यात एक जागा रिक्त असून दहापैकी आठ सदस्यांनी राजीनामे दिल्यामुळे ग्रामपालिकेत सरपंच व एक सदस्य अशी दोन संख्या राहिली आहे. त्यामुळे ग्रामपालिका त्वरित बरखास्त करून प्रशासक नेमावा, अशी मागणी उपसरपंचासह सदस्यांनी केली आहे.

कोट....

पंचायत समिती सदस्यासह उपसरपंच यांनी नियमबाह्य कामकाज तसेच बेकायदेशीर कामे करण्यासाठी माझ्यावर तसेच सरपंच यांच्यावरही सातत्याने दबावतंत्र आणत मनमानी कारभार करण्याचा प्रयत्न केला. विकासकामे करताना अडथळे आणले आहे .आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून त्यांचे हे सर्व बिनबुडाचे आरोप असून त्यात कोणतेही तथ्य नाही.

- अरुण आहेर,

ग्रामविकास अधिकारी, करंजवण

फोटो- ०३ करंजवण ग्रामपालिका

===Photopath===

030621\03nsk_46_03062021_13.jpg

===Caption===

फोटो- ०३ करंजवण ग्रामपालिका 

Web Title: Seven members including Karanjavan's sub-panch resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.