दीड महिन्यात सात शेतकऱ्यांची आत्महत्त्या
By admin | Published: February 20, 2016 10:40 PM2016-02-20T22:40:22+5:302016-02-20T22:43:27+5:30
दीड महिन्यात सात शेतकऱ्यांची आत्महत्त्या
नाशिक : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या कायम असून, शनिवारी निफाड तालुक्यातील एका शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन जीवनयात्रा संपविल्याने नवीन वर्षात दीड महिन्यात सात शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत. दरम्यान, यात बहुचर्चित केबीसी या आर्थिक डबघाईस आलेल्या कंपनीतील गुंतवणूकदारांचाही समावेश आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येचे सत्र थांबण्याची चिन्हे नाहीत. नवीन वर्षातही हे प्रमाण कायम असून, केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा प्रयत्न चालविला असतानाही त्यातून शेतकऱ्यांच्या पदरात फारसे काही पडलेले नाही, हे यावरून स्पष्ट झाले आहे.शनिवारी सकाळी दहा वाजता निफाड तालुक्यातील नारायणगाव येथील भागीरथ कोंडाजी आवारे (४८) यांनी राहत्या घरी विषारी औषध सेवन करून आत्महत्त्या केली. आवारे यांची नारायणगाव येथे २५ गुंठे जमीन आहे. त्यामुळे त्यांनी कर्जबाजारीपणामुळेच आत्महत्त्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. यासंदर्भात पोलीस व महसूल विभाग अधिक चौकशी करीत आहे. दीड महिन्यात आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सात झाली असून, त्यात जिजाबाई दगा पाटील (विराणे), अशोक गोविंद महाजन (लोहोणेर), शरद रामराव बोरस्ते (दिंडोरी), देवीदास अशोक दाते (रानवड), बाळासाहेब विठोबा वाघ (शिरसमणी), अनिल आनंदा शेलार (बिटाळे) यांचा समावेश आहे.
चौकट===