नाशिकमध्ये पंधरवड्यात सात खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2022 01:59 AM2022-06-02T01:59:37+5:302022-06-02T02:01:11+5:30

चौघा चोरांच्या टोळक्यामध्ये चोरीच्या मालाचे वाटप करण्यावरून वाद सुरू झाले. यावेळी दोघे घटनास्थळावरून निघून गेले. मात्र, दोघांमध्ये हा वाद चांगलाच वाढला आणि एकाने त्याच्या दुसऱ्या साथीदाराच्या डोक्यात दगड टाकून व चाकूने वार करून भर रस्त्यात पवन नथू पगारे (२२, रा.सोयगाव, मालेगाव) याला ठार मारले.

Seven murders in a fortnight in Nashik | नाशिकमध्ये पंधरवड्यात सात खून

नाशिकमध्ये पंधरवड्यात सात खून

Next
ठळक मुद्दे भरदिवसा युवकावर वार घटनास्थळावरून पळणाऱ्या हल्लेखोराला महिला पोलिसाने तेथेच पकडले

नाशिक : चौघा चोरांच्या टोळक्यामध्ये चोरीच्या मालाचे वाटप करण्यावरून वाद सुरू झाले. यावेळी दोघे घटनास्थळावरून निघून गेले. मात्र, दोघांमध्ये हा वाद चांगलाच वाढला आणि एकाने त्याच्या दुसऱ्या साथीदाराच्या डोक्यात दगड टाकून व चाकूने वार करून भर रस्त्यात पवन नथू पगारे (२२, रा.सोयगाव, मालेगाव) याला ठार मारले. बुधवारी (दि.१) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील ध्रुवनगरकडे जाणाऱ्या कॅनॉल रोडवर ही घटना घडली. येथून पोलीस ठाण्यात कर्तव्यावर जात असलेल्या एका महिला पोलीस कॉन्स्टेबल यांनी प्रसंगावधान दाखवत, दुचाकी थांबवून संशयित हल्लेखोराला घटनास्थळापासून काही मीटर अंतरावर पाठलाग करून पकडले.

भुरट्या चोऱ्या करणारा पवन नथू पगार व त्याचा साथीदार अतुल अजय सिंग (२१, रा.सातपुर कॉलनी) हे एका दुचाकीने कॅनॉल रोडवरून फिरत होते. त्यांच्यासोबत अन्य दोघे साथीदारही होते. रस्त्यालगत थांबून चोरीच्या मालाचे वाटप करण्यावरून चौघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. यावेळी दोघे दुचाकीने तेथून निसटले. मात्र, पवन व अतुल हे त्याच ठिकाणी उभे होते. यावेळी दोघांमध्ये शिवीगाळ सुरू झाल्याने, संशयित अतुल याने पवनच्या डोक्यात दगड घालून व चॉपरने वार करून खून केला. यावेळी हाणामारी झाल्याने आजूबाजूचे लोक, तसेच बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ठिकाणांचे मजूर धावले. आरडाओरड झाल्याने जवळच असलेले गंगापूर पोलिसांचे गुन्हे शोध पथकाचे वाहन वेगाने माघारी फिरले आणि घटनास्थळी त्वरित पो़होचले. यावेळी हातात मोठा चाकू घेऊन पळणाऱ्या संशयित अतुल यास, महिला पोलीस सरला खैरनार यांनी दुचाकीवरून उतरून पाठलाग करत पकडले. पोलिसांनी त्यास बेड्या ठोकून वाहनात डांबले. पवन हा रक्ताच्या थारोळ्यात कोसळून जागीच मृत्युमुखी पडला होता. घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला पथकाने कळविली. घटनास्थळी गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख हे पथकासह पोहोचले, तसेच काही वेळेत पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरेही घटनास्थळी दाखल झाले. पोलीस, फॉरेन्सिक विभाग यांनी घटनास्थळी पंचमाना करत पुराव्यांचे संकलन केले. संशयित अतुल व मयत पवार यांनी त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने सातपूर पोलिसांच्या हद्दीत रात्री भुरट्या चोऱ्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

Web Title: Seven murders in a fortnight in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.