कोटंबी घाटात अपघातात सात प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:17 AM2021-08-12T04:17:59+5:302021-08-12T04:17:59+5:30

पेठ : नाशिक ते गुजरात राष्ट्रीय मार्ग क्रमांक ८४८ वर पेठ तालुक्यातील कोटंबी घाटातील शेवटच्या वळणावर ...

Seven passengers injured in Kotambi Ghat accident | कोटंबी घाटात अपघातात सात प्रवासी जखमी

कोटंबी घाटात अपघातात सात प्रवासी जखमी

Next

पेठ : नाशिक ते गुजरात राष्ट्रीय मार्ग क्रमांक ८४८ वर पेठ तालुक्यातील कोटंबी घाटातील शेवटच्या वळणावर अवजड ट्रक व इको स्टार वाहनाचा अपघात झाल्याने ट्रक चालकासह सात प्रवासी जखमी झाले.

मंगळवारी (दि. १०) रोजी सकाळी नाशिककडून इको स्टार क्रमांक जीजे १५ सीके ०५२८ या वाहनाने गुजरातकडे काही प्रवासी जात असताना गुजरातकडून नाशिककडे खत घेऊन येणारा ट्रक क्रमांक एमएच १४ एएस ९९७८ ने वळणावर समोरील वाहनास धडक देत घाटातील संरक्षक कठड्याची भिंत तोडून दरीत कोसळला. यामध्ये ट्रकचा पुढचा केबिनच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला असून लहान वाहनाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ट्रकचा क्लिनर बाजूस फेकला गेल्याने बचावला. मात्र चालक गंभीर जखमी झाल्याने त्यास उपचारासाठी नाशिक येथे नेण्यात आले. तर इको गाडीतील तीन महिला व चार पुरुष किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

याबाबत सुमित राजन थॉमस (३१), रा. पिटमोरानगर, वापी गुजरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरोधात पेठ पोलिसांत मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस उपनिरीक्षक साळी तपास करीत आहेत.

कोटंबी घाटातील अपघातग्रस्त वाहने. (१० पेठ २/३)

100821\10nsk_10_10082021_13.jpg

१० पेठ २/३

Web Title: Seven passengers injured in Kotambi Ghat accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.