युवकाच्या आत्महत्त्येप्रकरणी सात जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 02:10 PM2017-11-27T14:10:28+5:302017-11-27T14:11:04+5:30
घोटी- इगतपुरी तालुक्यातील भंडारदरावाडी येथील एका युवकाने रविवारी रात्री गावाजवळील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली असून, या युवकाला घरातील सदस्यानी मारहाण करीत शारीरिक व मानिसक छळ केल्याने आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचा आरोप मृत युवकाच्या पत्नीने घोटी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्र ारीत केल्याने सात जणांविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भंडारदरावाडी येथे प्रकाश विश्वनाथ सारूक्ते हा आपल्या आईवडील ,पत्नी, भाऊ, बहीण यांच्यासोबत राहत होता. दोन दिवसांपूर्वी प्रकाश याचे घरातील सदस्याचे किरकोळ कारणावरून कडाक्याचे भांडण झाले होते. हे भांडण सोडविण्यासाठी रविवारी प्रकाश याचा साडू सोमनाथ गोडे हा आला होता.मात्र हे भांडण न शमता प्रकाशचे वडील विश्वनाथ सारु क्ते, आई भोराबाई सारु क्ते, भाऊ गिरीधर सारुक्ते, संतोष सारुक्ते,बहीण शोभा सारु क्ते यांच्यासह भारती सारूक्ते, लीला सारुक्ते आदींनी प्रकाश व सोमनाथ यास बेदम मारहाण केली.यात सोमनाथ हा गंभीर जखमी झाला.त्यास उपचारार्थ नजीकच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान ही मारहाण व छळ सहन न झाल्याने प्रकाश याने गावाजवळील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.याबाबत प्रकाशची पत्नी रोहिणी सारूक्ते हिने घरातील सदस्याच्या छळामुळे आत्महत्या केली असल्याची फिर्याद घोटी पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी सात जणांविरु द्ध गुन्हा दाखल केला त्यांना अटक केली आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास घिसाडी, मिलिंद नाविगरे, हवालदार जगताप आदी करीत आहेत.