मालेगाव शहरासह तालुक्यात सात जणांना प्रवेशबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:17 AM2021-09-14T04:17:13+5:302021-09-14T04:17:13+5:30
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन गाव परिसरात सार्वजनिक शांतता भंग होऊ नये, सण उत्सव काळात गैरकृत्यापासून ...
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन गाव परिसरात सार्वजनिक शांतता भंग होऊ नये, सण उत्सव काळात गैरकृत्यापासून दूर राहावे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार दत्तू पोपट खैरनार, बंडू महादू गांगुर्डे, सचिन शालिंदर जाधव, नबाबाई छबू माळी (राहणार रोकडोबा नगर दाभाडी), नबाबाई साहेबराव पवार (आदिवासी वस्ती, टेहरे), विजय छबू जाधव (इंदिरा नगर, टेहरे) करण ऊर्फ कुणाल राजेंद्र गायकवाड (नवनाथ नगर, संगमेश्वर) यांचेविरुध्द विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विकून त्यावर उदरनिर्वाह करणे व परिसरातील नागरिकांना अरेरावी करून दहशत निर्माण करणे आदी गुन्ह्यांमध्ये अटक करून त्याचेविरुद्ध कोर्टात खटले भरण्यात आले आहेत. वरील सातही इसमांविरुध्द विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.
इन्फो
असे आहेत आदेश
मालेगाव तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून दत्तू पोपट खैरनार, बंडू महादू गांगुर्डे यांना प्रवेशबंदीचे आदेश निर्गमित केल्यापासून २० सप्टेंबर २०२१ पर्यंत, सचिन शालिंदर जाधव, नबाबाई छबू माळी, नबाबाई साहेबराव पवार, विजय छबू जाधव यांना प्रवेशबंदी आदेश निर्गमित केल्यापासून २१ सप्टेंबर, २०२१ तर करण ऊर्फ कुणाल राजेंद्र गायकवाड यांना १९ सप्टेंबर २०२१ पर्यंत मालेगाव शहरासह तालुक्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.