ओझरला ३८२ जण होम क्वॉरण्टाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 10:54 PM2020-04-08T22:54:38+5:302020-04-08T22:55:02+5:30

वैयक्तिक कामासाठी दिल्लीच्या निजामुद्दीन स्थानकापासून परतीचा प्रवास सुरू केलेल्या येथील चार नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांना कोरोनाच्या तपासणीसाठी नाशिकच्या झाकीर हुसेन रु ग्णालयात दाखल केले आहे.त्या चौघांचे नमुने अद्याप प्रयोगशाळेत प्रलंबित असून, पुढील तपासणी अहवाल येईपर्यंत त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, दिल्लीहून आलेल्यांची कसून तपासणी के ली जात आहे.

Seven people quarantine Ozar | ओझरला ३८२ जण होम क्वॉरण्टाइन

ओझरला ३८२ जण होम क्वॉरण्टाइन

Next
ठळक मुद्देचौघांचे नमुने तपासणीसाठी रवाना : दिल्लीहून आलेल्यांची कसून तपासणी

ओझर : वैयक्तिक कामासाठी दिल्लीच्या निजामुद्दीन स्थानकापासून परतीचा प्रवास सुरू केलेल्या येथील चार नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांना कोरोनाच्या तपासणीसाठी नाशिकच्या झाकीर हुसेन रु ग्णालयात दाखल केले आहे.त्या चौघांचे नमुने अद्याप प्रयोगशाळेत प्रलंबित असून, पुढील तपासणी अहवाल येईपर्यंत त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, दिल्लीहून आलेल्यांची कसून तपासणी के ली जात आहे.
ओझर परिसरात बाहेरून आलेल्या एकूण ३८२ नागरिकांना क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. त्यातील २५९ नागरिक हे मुंबई, पुणे, कल्याण, ग्वाल्हेर, उत्तर प्रदेश, गुजरातमधल्या काही भागातून आले आहेत, तर १६ जण रशिया, दुबई, अबुधाबी, फ्रान्स, हॉँगकॉँग, थायलंड, दक्षिण आफ्रिका येथून आले होते.
ओझरमधून एकूण चौघांना नाशिकच्या रु ग्णालयात कोरोना चाचणीसाठी दाखल करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांची कोविड चाचणी केली जात आहे, यात नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. फक्त स्वत:ची काळजी घ्यावी व घराबाहेर पडू नये. जो तपासणी अहवाल येईल ते बघून पुढील निर्णय घेण्यात येईल.
- डॉ. चेतन काळे, कोरोना संपर्कअधिकारी, निफाड.

Web Title: Seven people quarantine Ozar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.