सात खासगी रुग्णालयांना कोरोना उपचारास परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 09:15 PM2020-08-19T21:15:40+5:302020-08-20T00:13:31+5:30

मालेगाव : महापालिकेतर्फे पथके तयारमालेगाव : महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात शहरातील सात खासगी रुग्णालयांना राज्य शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत जीवनदायी योजनेत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यास मान्यता दिली आहे. सदर रुग्णालयांना योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे बंधनकारक असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेतर्फे पथके तयार करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त दीपक कासार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Seven private hospitals allowed corona treatment | सात खासगी रुग्णालयांना कोरोना उपचारास परवानगी

सात खासगी रुग्णालयांना कोरोना उपचारास परवानगी

Next
ठळक मुद्देजीवनदायी योजनेत कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यास शासनाने मान्यता

मालेगाव : महापालिकेतर्फे पथके तयारमालेगाव : महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात शहरातील सात खासगी रुग्णालयांना राज्य शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत जीवनदायी योजनेत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यास मान्यता दिली आहे. सदर रुग्णालयांना योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे बंधनकारक असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेतर्फे पथके तयार करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त दीपक कासार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तयार करण्यात आलेली पथके नियंत्रण ठेवतील. प्रभागनिहाय तयार केलेल्या पथकात प्रभाग १ मध्ये प्रभाग अधिकारी हरिश डिंबर यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पचे पोलीस निरीक्षक, डॉ. सुनीता रोकडे, डॉ. मीना सूर्यवंशी, डॉ. जयश्री पवार, प्रभाग २ मध्ये प्रभाग अधिकारी श्याम बुरकुल यांच्या नेतृत्वाखाली आयेशानगरचे पोलीस निरीक्षक, नागरी आरोग्य केंद्राच्या डॉ. शगुप्ता, डॉ. लुभना, डॉ. ज्योत्सना नानावटी, प्रभाग ३ मध्ये प्रभाग अधिकारी किशोर गिडगे यांच्या नेतृत्वाखाली आझादनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक, नागरी आरोग्य केंद्राच्या डॉ. अलका भावसार, डॉ. अमरा अन्सारी, डॉ. शबीना यांचा समावेश आहे. सामान्य रुग्णालय, प्रयास हॉस्पिटल, सिक्स सिग्मा हॉस्पिटल, समर्थ हॉस्पिटल, नागराज हॉस्पिटल, चिंतामणी कॉम्प्लेक्समधील धन्वंतरी हॉस्पिटल आणि एकात्मता चौकातील हार्ट अ‍ॅण्ड सोल हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत जीवनदायी योजनेत कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

Web Title: Seven private hospitals allowed corona treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.