सात प्रस्ताव पुन्हा पाठविले : पाच सराईत गुन्हेगार तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 02:57 PM2019-01-28T14:57:21+5:302019-01-28T15:04:04+5:30
पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या आदेशान्वये सराईत गुन्हेगारांची तडीपारीची कारवाई सुरू करण्यात आली आहे
नाशिक : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी कारवायांमध्ये सातत्याने सक्रिय राहणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तडीपार करण्यात आले आहे. एकूण सात गुन्हेगारांचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेला कुठलाही धोका निर्माण होऊ नये, या उद्देशाने पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या आदेशान्वये सराईत गुन्हेगारांची तडीपारीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार प्रकाश दोंदे (रा. पाथर्डी), गणेश शिंदे (घरकुल प्रकल्प, वडाळा), हरी प्रसाद जोशी (कलानगर), फकिरा सावंत (सदिच्छानगर), प्रसाद कनकुटे (सदिच्छानगर) या पाच सराईत गुन्हेगारांना उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी तडीपार केले आहे. तसेच अकील पीरमंहमद शेख ऊर्फ बंटी, (रा. खंडोबा चौक, वडाळा), शौकत शहा (रा. सादिकनगर वडाळा), राकेश ऊर्फ पप्पू दोंदे (२८, पाथर्डी) विशाल ऊर्फ इंदा बंदरे (२८, रा. वडाळा), समीर ऊर्फनिजाम शेख (रा. जय मल्हार कॉलनी वडाळा), संकेत चंद्रात्रे (रा. पांडवनगरी) आदी सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यासाठी कोकाटे यांच्याकडे प्रस्ताव इंदिरानगर पोलीस ठाण्याकडून पाठविण्यात आले आहे. तडीपारासाठी प्रस्ताव पोलीस उपायुक्तांकडे पाठविण्यात आले आहे. तसेच काही सराईत गुन्हेगारांचे तडीपारीचे प्रस्ताव आणि प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे यांनी दिली.