जिल्ह्यात महिनाभरात स्वाइन फ्लूचे सात बळी
By admin | Published: March 25, 2017 01:06 AM2017-03-25T01:06:09+5:302017-03-25T01:06:27+5:30
नाशिक : शहर व जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा जोर वाढतच चालला असून, महिनाभरात स्वाइन फ्लूने आणखी सात बळी घेतले आहेत.
नाशिक : शहर व जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा जोर वाढतच चालला असून, महिनाभरात स्वाइन फ्लूने आणखी सात बळी घेतले आहेत. त्यामुळे बळींची एकूण संख्या १३ झाली असून, त्यातील शहरातील तीन, तर शहराबाहेरील दहा जणांचा समावेश आहे. उपाययोजनेत व लोकजागृती करण्यात महापालिका मात्र अजूनही उदासीन असल्याचे दिसून येत आहे. मुंबई-पुणे शहरापाठोपाठ नाशकातही स्वाइन फ्लूच्या आजाराने डोके वर काढायला सुरुवात केली आहे. जानेवारी ते २४ मार्च २०१७ या कालावधीत आतापर्यंत जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्ये ४९ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. त्यातील ४४ रुग्ण, तर मार्च महिन्यातच दाखल झाले आहेत. यामध्ये १८ रुग्ण मनपा हद्दीतील असून, ३१ रुग्ण शहराबाहेरील आहेत. महापालिका हद्दीतील तिघा रुग्णांचा बळी गेला आहे, तर दगावलेले दहा रुग्ण बाहेरील आहेत. (प्रतिनिधी)