सात वर्षांनी होणार मतपेटीचे दर्शन

By Admin | Published: January 24, 2017 01:25 AM2017-01-24T01:25:20+5:302017-01-24T01:25:35+5:30

पदवीधर निवडणूक : उमेदवार संख्येमुळे मतपेटीत वाढ

Seven years later, the ballot box will be held | सात वर्षांनी होणार मतपेटीचे दर्शन

सात वर्षांनी होणार मतपेटीचे दर्शन

googlenewsNext

नाशिक : लोकशाही बळकट करणाऱ्या मतदान प्रक्रियेत निवडणूक आयोगाने काळानुरूप बरेच बदल करून मतदाराला त्याचा हक्क अधिक सुटसुटीत व सुरळीतपणे बजावता यावा यासाठी पावले टाकत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर सुरू केला असला तरी, पदवीधर मतदारसंघासाठी पसंतीक्रमाने मतदान घेण्याची तरतूद असल्याने मतपेट्यांचे महत्त्व अद्याप कायम आहे. त्यामुळे सात वर्षांनंतर मतदारांना पदवीधर निवडणुकीत मतपेट्यांचे दर्शन होणार आहे.  सन २००४ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्राचा वापर करण्यास निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दर्शविला. त्यानंतरच्या सर्वच निवडणुकांसाठी मतदान यंत्राचाच वापर केला गेला. या यंत्रामुळे मतदान प्रक्रियेचा वेग वाढला त्याचबरोबर मतमोजणी करणे अधिक सोपे होऊन वेळेची बचत झाली, तसेच बाद मतांचे प्रमाणही नष्ट झाले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून वापरल्या जाणाऱ्या मतपेट्यांचे अस्तित्वही निवडणुकीतून हद्दपार झाले. तथापि, विधान परिषदेच्या जागांसाठी होणाऱ्या शिक्षक, पदवीधर, स्थानिक स्वराज्य संस्था या मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकाची पद्धत पाहता त्यासाठी मतपत्रिकांचा वापर करण्याची तरतूद आहे, परिणामी मतपेट्यांचे महत्त्वही त्यामुळे टिकून आहे. नाशिक जिल्ह्णात २०१० मध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतपेट्या वापरल्यानंतर थेट सात वर्षांनीच त्याचा वापर केला जात आहे. दरम्यान, नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात सतरा उमेदवार शिल्लक राहिल्याने त्यासाठी मतपत्रिका तयार करण्यात आली असून, मतपत्रिकेचा आकार मोठा झाल्याने आता प्रत्येक केंद्रावर तीन मतपेट्या ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक तयारी करताना प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानासाठी एक मतपेटी व एक अतिरिक्त ठेवण्याचे ठरविण्यात आले होते, परंतु उमेदवारांची संख्या वाढल्याने मतपत्रिकेचा वाढीव आकार लक्षात घेता, प्रत्येक मतदान केंद्रावर तीन पेट्या ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Seven years later, the ballot box will be held

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.