शेतकरी सुकाणू समितीच्या सतरा कार्यकर्त्यांवर ‘आंदोलनबंदी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:48 AM2017-11-27T00:48:03+5:302017-11-27T00:48:36+5:30

‘दाजीं’च्या सत्कारासाठी शनिवारी विश्रामगृहात जमलेल्या शेतकरी सुकाणू समितीच्या त्या १७ ‘साल्यांना’ आता सहा महिन्यांपर्यंत कुठल्याही आंदोलनात सहभाग घेता येणार नाही. सार्वजनिक शांतता भंग होऊन दखलपात्र स्वरूपाचा गंभीर गुन्हा या कार्यकर्त्यांकडून होण्याची शक्यता लक्षात घेऊन विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांनी दीर्घ मुदतीचे बंधपत्र का घेतले जाऊ नये, असे फर्मान नोटीसद्वारे सुनावले आहे.

Seventeen workers of 'Farmer Steering Committee' | शेतकरी सुकाणू समितीच्या सतरा कार्यकर्त्यांवर ‘आंदोलनबंदी’

शेतकरी सुकाणू समितीच्या सतरा कार्यकर्त्यांवर ‘आंदोलनबंदी’

googlenewsNext

नाशिक : ‘दाजीं’च्या सत्कारासाठी शनिवारी विश्रामगृहात जमलेल्या शेतकरी सुकाणू समितीच्या त्या १७ ‘साल्यांना’ आता सहा महिन्यांपर्यंत कुठल्याही आंदोलनात सहभाग घेता येणार नाही. सार्वजनिक शांतता भंग होऊन दखलपात्र स्वरूपाचा गंभीर गुन्हा या कार्यकर्त्यांकडून होण्याची शक्यता लक्षात घेऊन विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांनी दीर्घ मुदतीचे बंधपत्र का घेतले जाऊ नये, असे फर्मान नोटीसद्वारे सुनावले आहे.
उपमहापौर प्रथमेश गिते यांच्या विवाहाच्या निमित्ताने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे हे शहरात येणार असल्याचे गृहीत धरून सुकाणू समितीचे सतरा कार्यकर्ते शासकीय विश्रामगृहावर दानवे यांना ‘बुक्का’ लावून औंक्षण करत काळी शाल व पोशाख देऊन सत्कार करण्यासाठी जमले होते. या आंदोलनाची कुणकुण मुंबई नाका पोलिसांना लागताच पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांच्यासह मुंबई नाका पोलिसांचे पथक विश्रामगृहावर दानवे यांच्या आगमनाअगोदरच येऊन पोहचले. यावेळी आगळ्या अपारंपरिक सत्काराच्या हेतूने एकत्र आलेल्या सुकाणूच्या त्या १७ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. या कार्यकर्त्यांना भुजबळ यांनी फौजदारी प्रक्रियेनुसार कलम ११ अन्वये नोटीस बजावली आहे. सदर नोटिसीद्वारे भविष्यात त्या १७ कार्यकर्त्यांच्या वर्तनावरून कुठल्याही प्रकारे गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. संबंधितांकडून सहा महिन्यांच्या दीर्घ मुदतीचे प्रत्येकी दहा हजार रुपयांचे बंधपत्र का घेतले जाऊ नये? अशी विचारणा करण्यात आली आहे. याबाबत त्यांचे म्हणणे सोमवारी (दि.२७) सकाळी अकरा वाजेपर्यंत सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. मुदतीत संबंधितांनी त्यांचे म्हणणे सादर न केल्यास आपले कुठलेही म्हणणे नाही, असे समजून पोलीस अहवालानुसार कारवाई करण्याचा इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे. एकूणच सदर नोटीस बजावून पोलिसांनी या कार्यकर्त्यांना सहा महिन्यांपर्यंत सार्वजनिक शांततेचा व कायदा सुव्यवस्थेचा कुठल्याही प्रकारे भंग करणाºया आंदोलनापासून लांब राहण्याचा इशाराच दिला आहे. 
सतरा कार्यकर्ते अपारंपरिक सत्कारासाठी जमले होते. त्यांना शनिवारी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून भविष्यात शहरात कुठल्याही प्रकारे सार्वजनिक शांतता व कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. प्रत्येकी दहा हजार रुपयांचे बंधपत्र सहा महिन्यांच्या मुदतीचे भरून का घेतले जाऊ नये, अशी विचारणा करण्यात आली आहे.
- डॉ. राजू भुजबळ, सहायक आयुक्त

Web Title: Seventeen workers of 'Farmer Steering Committee'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.