अनुदानित दिव्यांग शाळांना सातवा वेतन आयोग लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:07 AM2021-05-04T04:07:13+5:302021-05-04T04:07:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : पुणे येथील दिव्यांग कल्याण आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या अनुदानित शाळा, कर्मशाळा तसेच मतिमंद बालगृहांतील शिक्षक ...

Seventh Pay Commission applicable to subsidized disabled schools | अनुदानित दिव्यांग शाळांना सातवा वेतन आयोग लागू

अनुदानित दिव्यांग शाळांना सातवा वेतन आयोग लागू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : पुणे येथील दिव्यांग कल्याण आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या अनुदानित शाळा, कर्मशाळा तसेच मतिमंद बालगृहांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

राज्यातील ११ हजार ५८ कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित कल्यांनतर नाशिकमधील शिक्षक व शिक्षकेतर संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

मागील महिन्यात पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिव्यांगांच्या शाळा/कर्माशालांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत लक्षवेधी मांडण्यात आली होती. त्या पार्श्वूमीवर सामाजिक न्याय विभागाने शासन निर्णय जारी करीत संबंधित शाळांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, सातवा वेतन आयोग लागू केल्याबद्दल जिल्हा दिव्यांग शाळा व कर्मशाळा कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी महेंद्र वाघमोडे, बाळासाहेब भुजबळ, रवींद्र कांबळे, प्रदीप निकम, मिलिंद मून, सीताराम नलगे, रमेश वनिस आदींनी निर्णयाचे स्वागत केले आहे.

Web Title: Seventh Pay Commission applicable to subsidized disabled schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.