नांदगाव तालुक्यात भीषण दुष्काळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 04:50 PM2019-05-14T16:50:31+5:302019-05-14T16:50:39+5:30
साकोरा : दुष्काळाच्या तडाख्यात उभा तालुका होरपळून निघत असून, शेतकरी आत्महत्या करू लागले असतानाच जिल्हा बँकेने कर्ज वसुलीसाठी जप्ती-लिलाव आदींद्वारे सूडसत्रच सुरू केले आहे. जनतेला दिलासा देण्याबाबत प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीचे निवेदन नार-पार जलहक्क समितीने तहसीलदार मनोज देशमुख यांची भेट घेऊन दिले. नांदगाव तालुक्यात भीषण दुष्काळ पडलाआहे.
साकोरा : दुष्काळाच्या तडाख्यात उभा तालुका होरपळून निघत असून, शेतकरी आत्महत्या करू लागले असतानाच जिल्हा बँकेने कर्ज वसुलीसाठी जप्ती-लिलाव आदींद्वारे सूडसत्रच सुरू केले आहे. जनतेला दिलासा देण्याबाबत प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीचे निवेदन नार-पार जलहक्क समितीने तहसीलदार मनोज देशमुख यांची भेट घेऊन दिले. नांदगाव तालुक्यात भीषण दुष्काळ पडलाआहे.
साकोरे आणि ग्रामीण भागातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून जनतेच्या समस्या जाणून नार-पार जलहक्क समितीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागण्या सादर केलेल्या आहेत.
तालुका दुष्काळी जाहीर होऊन सुमारे साडेतीन महिने झाले तरीदेखील शासन -प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना अद्यापपर्यंत अंमलात न आणल्याने तालुक्यात पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. चारा छावण्या व चारा डेपोमार्फत चारापुरवठा करून दुभत्या जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्नही सोडवावा, जिल्हा बँकेची निर्दयी कर्जवसुली थाबंविण्यात यावी व सर्व कर्जफेड करणाºया शेतकºयाला नवीन शेती हंगामासाठी तातडीने कर्जपुरवठा करण्यात येऊन त्यांना जगण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. पीकविम्यापोटी हजारो रु पये भरलेले असताना करोडपती झालेल्या विमा एजन्सीने शेतकºयाला आजपर्यंत एक छदामही दिलेला नाही. हा शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे त्यांना त्वरित मिळावे तसेच दुष्काळी कामे जुलै -आॅगस्टपर्यंत तसेच नवीन पीक हाती येईपर्यंत राबविण्यात यावी, जलसंधारणाची कामे नियोजनबद्धरितीने कार्यरत ठेवण्यात यावीत, आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबीयांना तातडीने शासकीय मदत उपलब्ध करून दिलासा द्यावा. त्यांच्या कुटुंबातील विद्यार्थी-मुलांच्या शिक्षण-संगोपनाची व्यवस्था शासकीय स्तरावरून सकारात्मकतेतून करण्यात यावी. शेतकºयांना शेती औजारे, पीक कर्ज खाते, दुष्काळी मदत व इतर साहाय्य हे प्रत्यक्षात शेतकºयालाच मिळावे आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
सदर निवेदनावर समितीचे अध्यक्ष अशोक परदेशी, विशाल वडघुले, संतोष गुप्ता, साहेबराव गुंजाळ, सुधाकर पवार, पंढरीनाथ काकड, अनिल शेलार, मच्छिंद्र वाघ, नीलेश चव्हाण, गणेश सरोदे, योगेश कदम, परसराम शिंदे, राजाभाऊ गुढेकर, संतोष बच्छाव आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षºया आहेत.
निवडणूक कामामुळे दुष्काळी उपाययोजना करण्यात विलंब झालेला आहे, सामाजिक संस्थेद्वारे चारा डेपो चालविण्याचे शासनाचे धोरण असून, अद्याप एकही संस्था पुढे आलेली नाही. पाण्याचे टँकर वाढविण्यात येत आहेत.
- मनोज देशमुख, तहसीलदार नांदगाव.