सांडपाणी जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 05:33 PM2018-12-14T17:33:38+5:302018-12-14T17:33:49+5:30
कळवण : सांडपाणी ही समस्या शहरांबरोबर आता ग्रामीण भागालाही भेडसावत आहे. सांडपाणी गटारीद्वारे थेट नदी नाल्यांत सोडले जात असल्याने त्याचा घातक परिणाम आरोग्यावर होतो. ही समस्या टाळण्यासाठी शरद पवार इंटरनॅशनल स्कूलमध्ये सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प तयार करण्यात आला असून, शालेय परिसरातील सर्व सांडपाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी पुन्हा शेती व बागेसाठी उपयोगात आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

गुरु दत्त शिक्षण संस्थेच्या मानूर परिसरात शरद पवार इंटरनॅशनल स्कूल, शरद पवार ज्युनिअर कॉलेज, अजितदादा पवार शिक्षणशास्त्र महाविद्यालय, लोकनेते डॉ. जे.डी. पवार कॉलेज आॅफ फार्मसी, कॉलेज आॅफ डी. फार्मसी , बी. फार्मसी, एम. फार्मसी, प्रेरणा फाउण्डेशन आदी शैक्षणिक संकुलांमध्ये २५०० विद्यार्थी शिक्षण घेत असून, निवासी शाळा आहे.
या शैक्षणिक संस्थांमधील सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी बंदिस्त गटार करण्यात आली असून, त्या गटारीतून परिसरातील सर्व सांडपाणी एकाच ठिकाणी एकत्र करून तेथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. शुद्धीकरण झालेले पाणी शेती व शालेय परिसरातील बागांना वापरण्यात येणार आहे. पाणी बचत व जल प्रदूषण रोखण्यासाठी पारंपरिक जलशुद्धीकरण प्रक्रि या पद्धतीला आधुनिक यंत्रणेची जोड देऊन अत्यंत उपयुक्त अशा सांडपाणी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन गुरुदत्त शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जे.डी. पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
गुरु दत्त शिक्षण संस्था संचलित शरद पवार इंटरनॅशनल स्कूल ही निवासी शाळा असल्याने व औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनी निवासी असल्याने दैनंदिन पाण्याचा वापर होत असल्याने सांडपाणी जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून हाती घेतले होते, ते पूर्णत्वास आले.