जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 01:56 AM2019-01-12T01:56:42+5:302019-01-12T01:57:09+5:30
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ अभियानांतर्गत बुलडाण्याच्या ‘बीजेएस’ कार्यपद्धतीप्रमाणे नाशिक जिल्ह्यातही ही योजना राबविण्यात येणार असून, खासगी संस्थांकडून या कामासाठी यंत्रसामग्री पुरविण्यात येणार असल्याने जनतेच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांनी केले.
नाशिक : ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ अभियानांतर्गत बुलडाण्याच्या ‘बीजेएस’ कार्यपद्धतीप्रमाणे नाशिक जिल्ह्यातही ही योजना राबविण्यात येणार असून, खासगी संस्थांकडून या कामासाठी यंत्रसामग्री पुरविण्यात येणार असल्याने जनतेच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांनी केले.
या योजनेची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे नाईस सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचा समारोप जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
जिल्ह्यात ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ अभियान राबविण्यासाठी बीजेएसचे सहकार्य लाभणार आहे. या संस्थेकडून
मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री
मिळणार असल्याने ही मोठी संधी समजून यंत्रणांनी अधिक प्रयत्न करावे व योजनेच्या अंमलबजावणीत प्रथम क्रमांकावर आणावा,
असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
अभियान राबविताना प्रस्ताव मान्यता प्रक्रिया वेगाने करणे तसेच लोकसहभाग वाढविणे या बाबींवर अधिक भर देणे आवश्यक असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सांगितले. बुलडाणाचे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वराडे यांनी सादरीकरणाद्वारे ह्यबीजेएस पॅटर्नह्णची माहिती दिली. लोकसहभाग वाढविण्याचे प्रयत्न केल्याने आणि प्रस्तावाची मान्यता प्रक्रिया वेगवान केल्याने बुलडाणा जिल्हा या अभियानात राज्यात प्रथम क्रमांकावर राहिला, असे त्यांनी सांगितले. अपर सचिव ताशिलवार यांनी अभियानाची माहिती दिली.
बुलडाणा येथील उप अभियंता क्षितीजा गायकवाड यांनी जलसंपदा विभागाने केलेल्या कामाचे सादरीकरण केले. कार्यशाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, प्रकल्प अधिकारी कुमार आशीर्वाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, बीजेएसचे जिल्हा समन्वयक नंदकुमार साखला, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ आदी उपस्थित होते. कार्यशाळेला जिल्ह्णातील उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी तसेच कृषी व जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
इंधन खर्च शासनाचा
अभियानासाठी यंत्र सीएसआरमधून, इंधन शासनाकडून आणि वाहतूक खर्च शेतकºयांकडून करावयाचा आहे. राज्यात काढलेल्या एक कोटी ९० लाख घनमीटर गाळापैकी ५० लाख घनमीटर गाळ बुलडाण्यात काढण्यात आला आहे. त्यासाठी जिल्हा युवा मित्र संघटनेचे सहकार्य लाभत आहे.