नऊ वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 04:28 PM2020-06-16T16:28:26+5:302020-06-16T16:29:06+5:30
‘जर कोणाला काही माहिती सांगितली तर तुला जीवंत ठेवणार नाही..’ असे संजयने त्या चिमुकल्याला धमकावले.
नाशिक : बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षणाचे कायदे जरी झाले असले तरी अद्यापही बालकांचे लैंगिक शोषण थांबलेले नाही. गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील उत्कर्षनगर भागात असाच एक घृणास्पद व निंदणीय प्रकार समोर आल्याने संताप व्यक्त होत आहे. एका नऊ वर्षाच्या चिमुकल्यावर संशयिताने मोबाईल, पैश्यांचे प्रलोभन दाखवून अत्याचार केले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी संशयित संजय शंकर मिसाळ (४५ रा.उत्कर्षनगर, त्र्यंबकरोड) याने त्याच्या परिसरातील एका नऊ वर्षाच्या बालकाला पैसे व मोबाईलचे आमिष दाखवून आपल्या घरात नेले आणि त्याच्यासोबत अनैसिर्गक कृत्य केले. याप्रकरणी ‘जर कोणाला काही माहिती सांगितली तर तुला जीवंत ठेवणार नाही..’ असे संजयने त्या चिमुकल्याला धमकावले. त्या चिमुकल्याने मोठे धाडस करून संजयकडून करण्यात आलेल्या अनैसर्गिक कृत्याचे कथन आपल्या पालकांजवळ केल्याने ही घटना समोर आली. या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पिडित मुलाच्या पित्याने दिलेल्या तक्र ारीवरून संशयित संजयविरूध्द गंगापूर पोलिसांनी अनैसर्गिक अपराध व बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक बैसाणे करीत आहेत.