एस.जी. पब्लिक स्कूलमध्ये मुख्याध्यापकांची कार्यशाळा
By admin | Published: July 2, 2014 09:26 PM2014-07-02T21:26:57+5:302014-07-03T00:19:16+5:30
एस.जी. पब्लिक स्कूलमध्ये मुख्याध्यापकांची कार्यशाळा
सिन्नर : ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत येथील मााध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या एस.जी. पब्लिक स्कूलमध्ये तालुक्यातील मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांची कार्यशाळा पार पडली.
नाशिक जिल्हा परिषद व तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने या संस्थेचे संचालक अण्णासाहेब गडाख यांच्या अध्यक्षतेखाली एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. गटविकास अधिकारी सुनील अहिरे यांनी शालेय परिसर, इमारतीचे बांधकाम, शालेय पोषण आहार, शालेय व्यवस्थापन, शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा, शैक्षणिक साहित्य, क्रीडांगण या संदर्भात येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले. अण्णासाहेब गडाख यांनी संस्थेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या उपाय-योजनांची माहिती देतानाच शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी तालुक्यातील कार्यशाळा, उद्बोधन वर्ग, प्रशिक्षण वर्ग यासाठी संस्थेच्या वतीने मदत करण्यात येईल, असे आश्वासन दिले. कार्यशाळेत प्रारंभी मुख्याध्यापक आर. बी. एरंडे यांनी स्वागत केले. पंचायत
समितीचे गटशिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी कार्यशाळेचा हेतू सांगितला.
या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे संचालक विजय गडाख, राजेश गडाख, सचिव दौलतराव मोगल, मूल्यांकन समितीचे सदस्य अशोक महालपुरे, शिक्षणतज्ज्ञ पी. बी. हिंगमिरे, शिक्षण विस्तार अधिकारी आर. बी. लहामगे, एस. एस. निकम, श्रीमती डी.वाय. कुवर, श्रीमती एस. बी. कोठावदे, डी. जी.पवार, मुसळगाव केंद्रप्रमुख सुजाता देसले आदिंसह तालुक्यातील मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख उपस्थित होते. एम.जी. सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. पी. एस. सोमवंशी यांनी आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी ए. डी. बस्ते, आर. डी. रौंदळ, आर. एच. सोनवणे, एस. आर. कुऱ्हाडे, एस. जी. पगार, बी. के. काळोखे, श्रीमती एस. बी. गजभार आदिंनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)