एस.जी. प्राथमिक विभागाचे कब बूलबूल चाचणी परीक्षेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 04:08 PM2020-08-31T16:08:53+5:302020-08-31T16:09:23+5:30
सिन्नर: दरवर्षी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड मुंबई-व- भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने 2019 -20 कब बुलबुल चतुर्थ चरण , हीरक पंख व सुवर्ण बाण या राज्यस्तरीय चाचणी परीक्षा नाशिक कार्यालयात घेण्यात आल्या होत्या.
सिन्नर: दरवर्षी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड मुंबई-व- भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने 2019 -20 कब बुलबुल चतुर्थ चरण , हीरक पंख व सुवर्ण बाण या राज्यस्तरीय चाचणी परीक्षा नाशिक कार्यालयात घेण्यात आल्या होत्या.
यात एस.जी. पब्लिक स्कूल प्राथमिक विभागांमधील सिन्नर तालुक्यातील एकमेव शाळेने सक्रिय सहभाग घेऊन सर्वाधिक आठ कब व सात बुलबुल विद्यार्थी चतुर्थ चरण व हीरक पंख या परीक्षेसाठी बसले होते . यात कब मध्ये आयुष सोनवणे, साई सोनवणे , यश पोटे, अभिराज विर ,भावेश शिनगर ,आर्यन शिसोदे, साहिल मुसमारे, ओंकार मंडलिक व बुलबुल मध्ये संस्कृती जाधव, आचल परदेशी ,कोमल सोनवणे, संचिता भांगरे, समृद्धी उबाळे, श्रावणी उबाळे, राधिका सोनवणे हे सर्व विद्यार्थी शंभर टक्के यशस्वी झाले. त्यांना राज्यस्तरीय प्रमाणपत्र व पदक प्राप्त झाले असुन,पुढे होणार्या सुवर्णबाण परीक्षेसाठी सर्व विद्यार्थी पात्र झाले आहे.
संस्थेचे सचिव राजेश गडाख, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक उदय कुदळे यांच्या प्रेरणेने शाळेतील कब मास्टर बापू चतुर ,फ्लॉक लीडर पद्मा गडाख यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेतील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे सेक्रेटरी मा. राजेश साहेब ,सिन्नर पंचायत समितीचे शिक्षण विभागाच्या गट शिक्षण अधिकारी मंजुषा साळुंखे , नाशिक जिल्हा स्काऊट गाईड कार्यालयाचे विभाग प्रमुख चंद्रकांत फुलपगारे साहेब, जिल्हा संघटन आयुक्त राजेंद्र महिरे साहेब, जिल्हा (गाईड) संघटन आयुक्त हेमांगी पाटील मॅडम जिल्हा समुपदेशक विश्वनाथ शिरोळे, केंद्रप्रमुख हेमंत भुजबळ आधी सर्वानी यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले. पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.