शब- ए -बारातला घरातच नमाज करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 03:55 PM2020-04-06T15:55:47+5:302020-04-06T15:57:35+5:30
येत्या बुधवार व गुरु वार रोजी मुस्लिम बांधवांचा शब-ए-बारात सण घरीच थांबून साजरा करण्याचे आवाहन ओझर पोलीसांनी केले आहे.
ओझर : येत्या बुधवार व गुरु वार रोजी मुस्लिम बांधवांचा शब-ए-बारात सण घरीच थांबून साजरा करण्याचे आवाहन ओझर पोलीसांनी केले आहे.
दि. ८ व ९ एप्रिलला शब-ए-बारात हा सण साजरा केला जातो. त्याला बडी रात असेही म्हटले जाते. मुस्लिम बांधव मस्जिदीत नमाज अदा करून कब्रस्थानमध्ये जातात. तेथे आपल्या पूर्वजांच्या कबरीवर फुले वाहून दर्शन घेतात व पूर्ण रात्र पुन्हा मस्जिदीत येऊन नमाज पठण करतात. त्यामुळे सर्व बांधवांची मोठी गर्दी होत असते. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या कायद्याचे उल्लंघन होऊ नये म्हणून ओझरचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी शाही मस्जिदीचे मौलाना अन्वर रजा व चांदणी चौक येथील अकबरी मस्जिदीचे मौलाना इस्माईल रजवी यांची भेट घेऊन त्यांना आवाहन केले. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सर्व मुस्लिम बांधवांनी कोरोनामुळे घरीच नमाज अदा करावी व प्रत्येक नागरिकाने कब्रस्थानमध्ये जाणे टाळावे असेही आवाहन करण्यात आले आहे.