शब-ए-मेराज : नमाजपठणासाठी मशिदींमध्ये रात्रभर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 04:04 PM2019-04-04T16:04:47+5:302019-04-04T16:27:22+5:30

बुधवारी रात्री शहरातील मशिदींमध्ये वरील सर्व कार्यक्रम उत्साहात पार पडले. रात्री साडेआठ वाजेपासून समाजबांधवांनी मशिदींमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली होती. मुख्य नमाजपठणानंतर मशिदींमध्ये धर्मगुरूंनी ‘मेराज’चे महत्त्व प्रवचनातून विशद केले.

Shab-e-Marez: Nightly crowd for mosque in mosques | शब-ए-मेराज : नमाजपठणासाठी मशिदींमध्ये रात्रभर गर्दी

शब-ए-मेराज : नमाजपठणासाठी मशिदींमध्ये रात्रभर गर्दी

googlenewsNext
ठळक मुद्देपैगंबरांवर आधारित स्तुतीपर काव्य मैफल ‘खिदमत’कडून गोरगरिबांना अन्न वाटप

नाशिक :इस्लामचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर व अल्लाह यांच्या प्रत्यक्ष भेटीची रात्र म्हणून ओळखली जाणारी ‘शब-ए-मेराज’ बुधवारी (दि.३) शहर व परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांसह पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. यानिमित्त मशिदींसह दर्ग्यांमध्ये समाजबांधवांची रात्री उशिरापर्यंत गर्दी झाली होती.
इस्लामी संस्कृतीत शब-ए-मेराज, शब-ए-बरात, शब-ए-कद्र या तीन रात्रींना अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त आहे. या रात्रींचे आगळेवेगळे वैशिष्ट्य धर्मग्रंथ कुराणमध्ये सांगितले गेले आहे. या रात्री एकापाठोपाठ तीन महिन्यांत येतात. अखेरची शब-ए-कद्रची रात्र रमजान पर्वमध्ये साजरी केली जाते. या रात्रींच्या औचित्यावर समाजबांधव मशिदींमध्ये रात्री एकत्र येऊन नमाजपठण, कुराणपठण, दरूदोसलामचे पठण करतात तसेच पैगंबरांवर आधारित स्तुतीपर काव्य मैफलही आयोजित केली जाते.
बुधवारी रात्री शहरातील मशिदींमध्ये वरील सर्व कार्यक्रम उत्साहात पार पडले. रात्री साडेआठ वाजेपासून समाजबांधवांनी मशिदींमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली होती. मुख्य नमाजपठणानंतर मशिदींमध्ये धर्मगुरूंनी ‘मेराज’चे महत्त्व प्रवचनातून विशद केले. तसेच मुख्य सोहळ्याचा समारोप विशेष दुवाने करण्यात आला. संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी यावेळी प्रार्थना करण्यात आली. यानिमित्त शहरातील सर्वच मशिदींवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. शहर व परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

भाविकांची दर्शनासाठी गर्दी
शहरातील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांच्या बडी दर्गा, तसेच हजरत सय्यद हसन रांझेशाह यांच्या आनंदवली दर्गा, पांडवलेणी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या हजरत सय्यद मलिकशाह हुसेनी बाबा यांच्या दर्ग्यावर दर्शन घेण्यासाठी भाविकांची रात्री उशिरापर्यंत गर्दी दिसून आली.

‘खिदमत’कडून गोरगरिबांना अन्न वाटप
जुने नाशिकमधील युवकांनी एकत्र येत स्थापन केलेल्या ‘खिदमत’ फाउंडेशनकडून शब-ए-मेराजच्या औचित्यावर शहरातील गोदाकाठ, बसस्थानक, रेल्वेस्थानक, पंचवटी, जिल्हा रुग्णालय आदी भागात गोरगरिबांना अन्नाचे वाटप करण्यात आले. सुमारे २५ ते ३० किलो व्हेज पुलाव तयार करून प्रत्येकी ७०० ग्रॅमची पाकि टे या सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून वाटण्यात आल्याची माहिती नायब काझी एजाज सय्यद यांनी दिली.

Web Title: Shab-e-Marez: Nightly crowd for mosque in mosques

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.