कडाक्याच्या उन्हापासून  ‘ग्रीन मॅट’ची सावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:25 AM2019-04-28T00:25:16+5:302019-04-28T00:25:47+5:30

थंड हवेचे ठिकाण असा लौकिक असलेल्या नाशिकच्या तापमानातील वाढ चिंता निर्माण करणारी ठरली आहे. गेल्या चार वर्षांपासून ४० अंशांवर तापमान जात असताना यंदा तर एप्रिलमध्येच तापमानाने उच्चांक गाठला आहे.

The shade of green matte from the hot summer | कडाक्याच्या उन्हापासून  ‘ग्रीन मॅट’ची सावली

कडाक्याच्या उन्हापासून  ‘ग्रीन मॅट’ची सावली

Next

नाशिक : थंड हवेचे ठिकाण असा लौकिक असलेल्या नाशिकच्यातापमानातील वाढ चिंता निर्माण करणारी ठरली आहे. गेल्या चार वर्षांपासून ४० अंशांवर तापमान जात असताना यंदा तर एप्रिलमध्येच तापमानाने उच्चांक गाठला आहे. दररोज वाढणाऱ्या कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झालेल्या नाशिककरांनी उन्हापासून दिलासा मिळविण्यासाठी ग्रीन मॅटचा पर्याय शोधला आहे. शहरात सध्या मोठ्या प्रमाणात ग्रीन मॅटचा वापर वाढला असल्याचे दिसून येत आहे.
नाशिककर यंदा कडाक्याच्या उन्हामुळे चांगलेच तापले आहेत. लहरी हवामानाबरोबरच नाशिककरांना दिवसेंदिवस वाढणाºया तापमानामुळे उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. राज्यात उष्णतेची लाट असल्यामुळे तर उन्हाची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे. एप्रिल महिन्यातील तापमान लक्षात घेता गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाल्यामुळे उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी नाशिककर अनेकविध मार्गांचा वापर करीत आहे.
शहरात सध्या बंगले, रो-हाउसेस तसेच इमारतीच्या गॅलरी या ग्रीन मॅटने झाकलेल्या दिसून येत आहेत. त्याबरोबरच ज्यांना पार्किंगची व्यवस्था नाही किंवा रो-हाउस समोरील जागेत उभ्या करण्यात आलेल्या चारचाकी वाहनाच्या सावलीसाठीदेखील ग्रीन मॅटचा वापर होताना दिसत आहे.
उन्हाच्या झळा कमी करणाºया ग्रीन मॅटचा वापर सुरुवातील शेतीसाठी होत असताना आता तो घरोघरी होत असल्याचे दिसते. घरासमोरील बगीचा, फुलांच्या कुंड्यांचे संरक्षण करण्याबरोबरच उन्हाच्या झळांची तीव्रता कमी करण्यासाठी दारासमोर किंवा अंगणात ग्रीन मॅट लावल्या जात आहेत. त्याबरोबरच इमारतीच्या दर्शनी भागाकडे असलेल्या गॅलरीतून घरात येणारे ऊन कमी करण्याच्या दृष्टीनेदेखील संपूर्ण गॅलरी ग्रीन मॅचचा वापर करून बंद करण्यात आल्याचे दिसून येते. उन्हाच्या झळा कमी करण्याबरोबरच उजेड आणि सावली देण्याचा गुणधर्म ग्रीन मॅटमध्ये असल्यामुळे उन्हाळ्यात ग्रीन मॅटचा वापर केला जातो.
ग्रीन मॅट खरेदीकडे कल
यंदा उन्हाची वाढती तीव्रता पाहता ग्रीन मॅटचा वापर वाढल्याचे दिसते. अगदी झोपडपट्टीपासून ते आलिशान परिसर तसेच सोसायट्या, कॉलनी परिसरातदेखील ग्रीन मॅटचा वापर वाढल्याचे दिसते. वाहनांच्या संरक्षणापासून ते झाड, कुंडीतील रोपे उन्हापासून वाचविण्यासाठी ग्रीन मॅट वापराला प्राधान्य दिले जात आहे. शहरातील रहिवासी भागात नजर टाकल्यास अशा प्रकारच्या ग्रीन मॅट सर्वत्र दृष्टीस पडत आहेत. उन्हापासून दिलास, स्वस्त आणि टिकाऊ असल्यामुळे ग्रीन मॅट खरेदीकडे नाशिककरांचा कल असल्याचे दिसते.
शेतीकामासाठी असलेल्या मागणीपेक्षा घरासमोरील सावलीसाठी ग्रीन मॅटची मागणी सुमारे ८० टक्क्यांनी वाढली आहे. उन्हाच्या झळा आणि सावलीसाठी विविध प्रकारच्या मॅट्स बाजारात उपलब्ध आहेत. २० ते ४५ रुपये स्क्वेअर मीटरपर्यंत या असलेल्या मॅट्सला मागणी वाढत आहे. जाड ते बारीक जाळी अशा प्रकारात या मॅट्स असून, यंदा मागणीत मोठी वाढ झालेली आहे.
- अनिल बागुल, प्लॅस्टिक व्यावसायिक, भद्रकाली मार्केट

Web Title: The shade of green matte from the hot summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.